AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Kashyap | या कारणामुळे अनुराग कश्यप यांना चक्क पत्नीने काढले होते घराबाहेर, म्हणाले दिवस रात्र मी फक्त…

चित्रपटाचे (Movie) प्रमोशन करताना अनुराग कश्यप आपल्या पर्सनल लाईफविषयी देखील महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

Anurag Kashyap | या कारणामुळे अनुराग कश्यप यांना चक्क पत्नीने काढले होते घराबाहेर, म्हणाले दिवस रात्र मी फक्त...
Image Credit source: Forbes
| Updated on: Feb 02, 2023 | 7:12 PM
Share

मुंबई : अनुराग कश्यप आणि विवेक अग्नीहोत्री यांच्यामध्ये कायमच सोशल मीडियावर एक वाॅर सुरू असतो. दोघेही एकमेकांवर टीका करतात. यांचा वाद सोशल मीडियावर नेहमीच सुरू असतो. सध्या अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हे त्यांच्या आगामी प्यार विथ डीजे मोहब्बत या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट उद्या ३ फेब्रुवारी रोजी रिलीज होतोय. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अनुराग कश्यप बिझी आहेत. चित्रपटाचे (Movie) प्रमोशन करताना अनुराग कश्यप आपल्या पर्सनल लाईफविषयी देखील महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. नुकताच अनुराग कश्यप यांनी मोठा खुलासा करत म्हटले की, मी काही वर्ष डिप्रेशनमध्ये (Depression) होतो आणि मी एका खोलीमध्ये स्वत: ला बंद करत दिवस रात्र फक्त आणि फक्त दारू प्यायचो. इतकेच नाही तर अजूनही काही मोठे खुलासे हे अनुराग कश्यप यांनी केले आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अनुराग कश्यप म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात खूप जास्त चढउतार बघितले आहेत. मात्र, माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, मी स्वत: ला एका रूममध्ये कोंडून घेतले होते आणि दिवस रात्र दारू प्यायचो.

यादरम्यान मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि मला काहीच कळत नव्हते. माझ्या दारू पिण्याच्या सवयीला कंटाळून माझी बायको आरती (एक्स पत्नी) हिने मला लाथ मारून घराच्या बाहेर हाकलून दिले होते.

यावेळी माझी मुलगी आलिया ही फक्त चार वर्षांची होती. खरोखरच हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता. एका मागून एक असे तब्बल पाच चित्रपट माझे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते. या चित्रपटांनी मला डिप्रेशनचे शिकार बनवले होते.

इतकेच नाही तर यानंतर मला अनेक चित्रपटांमधून काढण्यात आले. पुढे अनुराग कश्यप म्हणाले, यादरम्यान मी सतत रागात असायचो आणि हा माझा राग बाॅलिवूडमधील काही लोकांवर असायचा.

काही दिवसांपूर्वी दोबारा थी हा चित्रपट अनुराग कश्यप यांचा रिलीज झाला. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू ही महत्वाच्या भूमिकेत होती. अनुराग कश्यप कायमचा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत येतात. आता ही चित्रपटाच्या प्रमोशन वेळी त्यांनी काही धक्कादायक खुलासे केल्याने ते चर्चेत आले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?