Helmet Full Songs List : अपारशक्ती खुराना-प्रनूतन बहल यांची ‘बँड बाज गया’ गाण्यावर धमाल, पहा व्हिडिओ

हा चित्रपट छोट्या शहरांच्या भोळसटपणाचा एक मनोरंजक शोध आहे आणि अशा वातावरणामध्ये अंतर्दृष्टी प्रदान करतो जेथे बर्थ कंट्रोल साधनांचा प्रवेश अनेक सामाजिक आव्हाने आणि मानसिक हँग-अपसह भरलेला आहे.

Helmet Full Songs List : अपारशक्ती खुराना-प्रनूतन बहल यांची 'बँड बाज गया' गाण्यावर धमाल, पहा व्हिडिओ
अपारशक्ती खुराना-प्रनूतन बहल यांची 'बँड बाज गया' गाण्यावर धमाल


मुंबई : अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहल, अभिषेक बॅनर्जी आणि आशिष वर्मा अभिनीत ‘हेल्मेट’ हा एक बहुप्रतिक्षित थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे जो लोकांना अतिशय मनोरंजक पद्धतीने कंडोम खरेदी करताना लोकांना वाटणारा संकोच दाखवणार आहे. ज्यानेही याचा ट्रेलर पाहिला आहे त्याला हसू आवरता आले नाही आणि ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.

बँड बाज गया’ चा व्हिडिओ रिलीज

ट्रेलर लाँचच्या शानदार यशानंतर, निर्मात्यांनी आता पूर्ण ऑडिओ अल्बम (झी म्युझिक) आणि ‘बँड बाज गया’ चा व्हिडिओ रिलीज केला आहे. हेल्मेटच्या ऑडिओ अल्बममध्ये पाच गाणी आहेत, ज्यांची सुरुवात ‘बँड बाज गया’ पासून होते. हे पेपी ट्रॅक टोनी कक्कर आणि विभोर पराशर यांनी गायलेले असून टोनी कक्कर यांचे संगीत आणि गीत आहेत. या गाण्याचा व्हिडिओ आता रिलीज करण्यात आला आहे.

आकर्षक ट्रॅकसह आहे चित्रपटाचे थीम साँग

‘डोली’ हे ब्रिजेश शांडिल्यने गायलेले एक उत्साही लग्नाचे गाणे आहे जे तनिष्कने संगीतबद्ध केले आहे आणि गीत वायूने लिहिले आहे. गोल्डबॉय आणि शिप्रा गोयल यांनी गायलेले एक भावनिक आणि मधुर पंजाबी ट्रॅक ‘बर्दाद’ ड्युएट आहे, ज्याचे लिरिक्स आणि संगीत निर्माणने दिले आहे. तसेच, ‘बर्बाद’ हे मेल व्हॉईसमध्ये देखील उपलब्ध आहे जे गोल्ड बॉयने गायले आहे. शेवटी, एका आकर्षक ट्रॅकसह चित्रपटाचे थीम साँग ‘मौका मौका’ आहे, जे शुभम शिरुलेने गायले आहे, जॅम 8 ला शुभम शिरुले आणि आना रहमानने संगीत दिले आहे आणि गीत श्लोक लाल यांनी लिहिले आहे.

छोट्या शहरांच्या भोळसटपणाचा एक मनोरंजक शोध

हा चित्रपट छोट्या शहरांच्या भोळसटपणाचा एक मनोरंजक शोध आहे आणि अशा वातावरणामध्ये अंतर्दृष्टी प्रदान करतो जेथे बर्थ कंट्रोल साधनांचा प्रवेश अनेक सामाजिक आव्हाने आणि मानसिक हँग-अपसह भरलेला आहे. निर्मात्यांनी गेल्या आठवड्यात ट्रेलर रिलीज केला, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि चाहते ‘हेल्मेट’ सह या विचित्र आणि मजेदार राईडची वाट पाहू शकत नाहीत, जे बर्थ कंट्रोल साधनावरील पहिला भारतीय चित्रपट आहे. 3 सप्टेंबर रोजी झी5 वर प्रीमियरसाठी तयार, ‘हेल्मेट’ सोनी पिक्चर्स नेटवर्क प्रोडक्शन्स आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्या डीएम मूव्हीज निर्मित आहे आणि रोहन शंकर लिखित पटकथा आणि संवाद असून सतराम रमानी दिग्दर्शित आहेत.

इतर बातम्या

IND vs ENG 3rd Test Day 1 Live: भारत आणि इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय

Anil Parab : नारायण राणेंनी बाह्या सरसावल्या, पहिला धक्का अनिल परबांना देण्याची तयारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI