AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda | कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये वाद, मामी सुनीताने सुनावले खडेबोल

कृष्णा अभिषेक आणि अभिनेता गोविंदा यांच्या नात्यामध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसत आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गोविंदाने कृष्णा अभिषेक यांच्याबद्दल काही मोठे खुसाले केले असून कृष्णा अभिषेक खोटे बोलत असल्याचे देखील म्हटले आहे.

Govinda | कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये वाद, मामी सुनीताने सुनावले खडेबोल
| Updated on: Mar 08, 2023 | 2:34 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यामधील मतभेद आता जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यामध्ये काहीतरी बिनसले आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णा अभिषेक आणि त्याची बहीण टीव्ही अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) यांनी एक मुलाखती दिली होती. या मुलाखतीमध्ये दोघांनीही लहानपणीचे काही किस्से सांगितले. यावेळी त्यांनी लहानपणी गोविंदाने (मामा) कशाप्रकारची मदत केली हे सर्वकाही सांगितले. लहानपणी काय काय आयुष्यामध्ये घडले आणि कशी परिस्थिती होती, हे आरती आणि कृष्णाने सांगितले.

मुलाखतीमध्ये बोलताना आरती सिंह आणि कृष्णा अभिषेक म्हणाले की, दर महिन्याला मामा (गोविंदा) आम्हाला 2000 रूपये द्यायचे. इतकेच नाहीतर त्यांनी लहापणी कशा पध्दतीने गोविंदाने मदत केली हे देखील सांगितले. मात्र, या सर्व गोष्टी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांना अजिबातच पटलेल्या दिसत नाहीत.

नुकताच गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांना मुलाखतीमध्ये आरती सिंह आणि कृष्णा अभिषेक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर गोविंदाची पत्नी सुनीता चिडली आणि म्हणाली की, त्यांच्याबद्दल तुम्ही कशाला विचारत आहेत. यावर गोविंदा म्हणाला की, मी कधीच फॅमिलीमधील काही गोष्ट मीडियासमोर बोलत नाही.

पुढे गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा म्हणाली की, मला या सर्व गोष्टींची प्रचंड चिड येते. आरती सिंह आणि कृष्णा अभिषेक यांनी मुलाखतीमध्ये जे काही बोलले ते खरे नाहीये. गोविंदाची पत्नी पुढे म्हणाली की, मला खरोखरच स्वत: चा आता राग येतो की, मी त्यांचे संगोपन का केले. त्यांनी सरळ सरळ खोटे बोलत असून ते मुलाखतीमध्ये म्हणाले की, गोविंदा त्यांना महिन्याला फक्त 2000 रूपये देत होता. मला हे देखील कळाले नाही की, ते खोटे का बोलत आहेत?

गोविंदा पुढे म्हणाला की, अगोदर सर्व गोष्टी माझी मम्मी ठरवत असतं. मला माहिती नाही की, लहान असताना त्यांना कोणी काय सांगितले. पुढे गोविंदा म्हणावा की, त्यांचे वडील खूप चांगले होते, त्यांची आई माझी बहीण अतिशय चांगली होती. त्यामुळे मला यांच्यासोबत कधीच कोणते वाद करण्याची इच्छा अजिबात नाहीये. जर तुम्हाला माझ्याबद्दल काही चांगले बोलताना येत नाहीतर मी तुमचा धन्यवाद मानतो. खरी गोष्ट एक दिवस पुढे येईल.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.