Aryan Khan | बालकलाकार म्हणून आर्यन खानचं बॉलिवूड पदार्पण, ‘या’ चित्रपटात केलंय काम!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहे. अभिनेत्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजावर उपस्थित होता, ज्यावर रविवारी रेव्ह पार्टी सुरू होती. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) या जहाजावर छापा टाकला, त्यानंतर आता आर्यन एनसीबीच्या ताब्यात आहे.

Aryan Khan | बालकलाकार म्हणून आर्यन खानचं बॉलिवूड पदार्पण, ‘या’ चित्रपटात केलंय काम!
आर्यन खान, मुक्काम-आर्थर रोड जेल, बराक क्रमांक 1
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 8:09 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहे. अभिनेत्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजावर उपस्थित होता, ज्यावर रविवारी रेव्ह पार्टी सुरू होती. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) या जहाजावर छापा टाकला, त्यानंतर आता आर्यन एनसीबीच्या ताब्यात आहे. आर्यन खानची एनसीबीने बराच काळ चौकशी केली, ज्यामध्ये आर्यनने ड्रग्ज घेतल्याची कबुलीही दिली. अशा स्थितीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे चित्रपटात पदार्पण होण्यापूर्वीच त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

मात्र, हे खरे आहे की आर्यन खानला त्याच्या वडिलांप्रमाणे सुपरस्टार अभिनेता बनण्याची इच्छा नाही. पण त्याला चित्रपट निर्मितीमध्ये करिअर करायचे आहे,  ज्यासाठी त्याने परदेशातून शिक्षण घेतले होते. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, आर्यन खानने आधीच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. चला तर जाणून घेऊया आर्यन खानने कोण-कोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे…

कभी अलविदा ना कहना

फार कमी लोकांना माहित आहे की, आर्यन खानने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तो त्याचे वडील शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका केली होती.

कभी खुशी कभी गम

शाहरुख खानचा ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट क्वचितच कोणी पाहिला नसेल. या चित्रपटातील शाहरुखची भूमिका चाहत्यांना चांगलीच आवडली होती. त्याचबरोबर या चित्रपटात आर्यनने त्याचे वडील शाहरुख खानच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.

हम है लाजवाब

आर्यन खानने चित्रपटांमध्येही आपले आवाज कौशल्यही दाखवले आहे. काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘हम है लजवाब’ या अॅनिमेटेड चित्रपटात त्याने व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले. विशेष गोष्ट म्हणजे, या चित्रपटात आवाज दिल्यानंतर आर्यनने सर्वोत्कृष्ट डबिंग चाईल्ड व्हॉईस आर्टिस्टचा पुरस्कारही पटकावला होता.

लायन किंग

आर्यन खानने ‘हम है लाजवाब’ नंतर ‘द लायन किंग’ चित्रपटात आपल्या आवाजाची जादू दाखवली. आर्यनने या चित्रपटातही आपला आवाज दिला होता. त्याने चित्रपटातील सिम्बा या पात्रासाठी आवाज दिला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

पठाण

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात किंग खानसोबत जॉब अब्राहम आणि दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. खूप कमी लोकांना माहित आहे की, या चित्रपटात स्फोटक अॅक्शन सीक्वेन्स दाखवले जातील, ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यननेही अनेक इनपुट दिले आहेत.

हेही वाचा :

Happy Birthday Raaj Kumar : मुंबईत पोलिस उपनिरीक्षक ते सुप्रसिद्ध अभिनेते, वाचा राजकुमार यांचा फिल्मी प्रवास

‘जेव्हा स्त्री एखादी गोष्ट करते, तेव्हा प्रश्न उपस्थित केलेच जातात…’, घटस्फोटानंतर समंथाने पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.