तैमूरचा ‘टॅटू पार्टनर’ बनला मोठा भाऊ इब्राहीम खान, करीना कपूरने शेअर केला भावांचा क्यूट फोटो!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 2:23 PM

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor-Khan) हिचा मुलगा तैमूर अली खान (Taimur) त्याचा मोठा भाऊ इब्राहिम अली खानसोबत (Ibrahim Ali Khan) नेहमीच धमाल करताना दिसतो. दोघांनाही बऱ्याच वेळा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना पाहिले गेले आहे.

तैमूरचा 'टॅटू पार्टनर' बनला मोठा भाऊ इब्राहीम खान, करीना कपूरने शेअर केला भावांचा क्यूट फोटो!
Kareena Kapoor

Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor-Khan) हिचा मुलगा तैमूर अली खान (Taimur) त्याचा मोठा भाऊ इब्राहिम अली खानसोबत (Ibrahim Ali Khan) नेहमीच धमाल करताना दिसतो. दोघांनाही बऱ्याच वेळा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना पाहिले गेले आहे. सारा आणि इब्राहिम दोघेही करीना कपूरच्या मुलांसोबत क्युट फोटो शेअर करत राहतात. करीना कपूरसोबत इब्राहिम आणि सारा अली खानचे बॉण्डिंग देखील खूप चांगले आहे. आता करीना कपूरने इब्राहिम आणि तैमूरचा फोटोही शेअर केला आहे आणि एक विशेष कॅप्शनही ठेवले आहे.

खरंतर, बुधवारी सैफ अली खानची बहीण सोहा अली खानची मुलगी इनाया नौमी केमू हिचा वाढदिवस होता. इब्राहिम आणि तैमूर यांनी लहान बहीण इनायाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मॅचिंग टॅटू काढले होते. करीनाने इन्स्टाग्रामवर दोघांचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये ‘बिग ब्रदर’ लिहिले.

पाहा पोस्ट :

त्याचवेळी इब्राहिम खाननेही हा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘एकमेव व्यक्ती ज्याच्यासोबत मी मॅचिंग टॅटू काढू शकतो.’ दोघेही प्रत्यक्षात सोहा अली खानची मुलगी आणि लहान बहीण इनायाच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचले होते.

जेह देखील पार्टीत सामील

या चित्रात दोघेही खूप क्युट दिसत आहेत. इब्राहिम खानने चेकर शर्ट घातलेला आहे तर, तैमूर डेनिम शर्टमध्ये क्यूट स्माईल देताना दिसत आहे. करीना कपूरही जेह आणि तैमूरसोबत या पार्टीला पोहोचली होती. बेबी जेहही करीनाच्या मांडीवर खूप क्युट दिसत होता.

त्याचवेळी करीना कपूर या पार्टीत फुलांची डिझाईन असलेल्या कुर्त्यामध्ये दिसली. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. करीना कपूरने स्वतः जेहला आपल्या हातात धरले होते. जेहचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करीना कामात व्यस्त

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री करीना कपूर, आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान देखील कॅमिओ करणार आहेत. याशिवाय करीना कपूर करण जोहरच्या ‘तख्त’मध्येही दिसणार आहे.

करीना कपूर खानला बंगले आणि गाड्यांची आवड

अभिनेत्री करीना कपूरकडे स्वत:च्या कमाईचे लक्झरी बंगले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, वांद्रे येथील फॉर्च्यून हाईट्समध्ये या अभिनेत्रीचा 4BHK अपार्टमेंट आहे. इतकेच नाही तर, तिचे स्वित्झर्लंडच्या Gstaa येथेही घर असल्याचे म्हटले जाते.

करीना कपूर यांना वाहनांची प्रचंड आवड आहे आणि तिच्याकडे बर्‍याच गाड्या देखील आहेत. ज्यात मर्सिडीज बेंझ एस क्लास या गाडीचा समावेश आहे. या मर्सिडीज बेंझ एस-क्लासची किंमत सुमारे 1.40 कोटी रुपये आहे. तर, तिच्याकडे ऑडी क्यू 7 गाडी देखील आहे, जिची किंमत 93 लाख रुपये आहे. या शिवाय तिच्याकडे रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही आणि लेक्सस एलएक्स 470 या जवळपास 2.32 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी करीना कपूर पुन्हा एकदा आई बनली आहे. तिने पुन्हा एकदा मुलाला जन्म दिला आहे. मात्र, अभिनेत्रीने अद्याप आपल्या मुलाचे नाव जाहीर केलेले नाही. करीना शेवट ‘गुड न्यूज’ या चित्रपटात दिसली होती. आता ती आमीर खानसमवेत ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू आहे.

हेही वाचा :

Gautami Deshpande : पाहा! गौतमी देशपांडेंचं निखळ खळखळतं हास्य अन् ब्रिटनच्या राणीसारखा लूक; चाहते म्हणतात…

Sardar Udham Trailer Out : स्वातंत्र्याची धगधगती आग, देशप्रेमाचा सळसळता उत्साह, पाहा विकी कौशलच्या ‘सरदार उधम’चा ट्रेलर

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI