Video | राखी सावंतने धारण केला श्रीदेवीचा नागीण अवतार, ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल हसू…

‘बिग बॉस 14’मध्ये धमाका केल्यानंतर एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आता तिच्या मजेदार व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे.

Video | राखी सावंतने धारण केला श्रीदेवीचा नागीण अवतार, ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल हसू...
राखी सावंत

मुंबई : ‘बिग बॉस 14’मध्ये धमाका केल्यानंतर एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आता तिच्या मजेदार व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे. राखी सावंत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि दररोज ती मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी राखीला चक्क नागीण बनण्याची इच्छा झाली होती. तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘नगीना’ या चित्रपटाच्या गाण्यात त्यांच्या जागी स्वतःचा चेहरा मॉर्फ केला आहे. राखीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना हसू आवरत नाहीय (Bigg Boss 14 fame Actress Rakhin Sawant share Nagin funny video).

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये राखी सावंतने लिहिले, ‘मला श्रीदेवीजी खूप आवडतात. माझा आवडता चित्रपट नागीन आहे. जर हा चित्रपट पुन्हा तयार करायचा झाला, तर मग कोणाला कास्ट करावे? आपली निवड कमेंटमध्ये शेअर करा.’ तिला या रुपात पाहून राखीचे चाहते खूप खुश झाले आहेत. पण, स्वत:ला श्रीदेवीची चाहती असल्याचे सांगणार्‍या राखी सावंतने या चित्रपटाचे नावच चुकीचे लिहिले आहे. हे नागीन नाही तर ‘नगीना’ या चित्रपटाचे हे गाणे आहे.

पाहा राखीचा मजेशीर व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

(Bigg Boss 14 fame Actress Rakhin Sawant share Nagin funny video)

जावेद अख्तर बनवणार राखीचा बायोपिक?

राखी सावंत यांनी नुकतेच एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा होता. इतकेच नव्हे तर, राखीने आपल्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीला घ्यावे हे देखील त्यांना सुचवले होते. राखीच्या या वक्तव्याची सगळेच जन खिल्ली उडवत होते. परंतु, जावेद अख्तरने स्वतः या प्रकरणाचे सत्य सांगितले आहे.

स्पॉटबॉयच्या अहवालानुसार, जावेद अख्तर यांनी राखी सावंत जे म्हणत आहे, ते बरोबर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘4-5 वर्षांपूर्वी आम्ही फ्लाइटमध्ये भेटलो होतो आणि तिने मला तिच्या बालपणाबद्दल सांगितले. तेव्हा मीच तिला सांगितले की, एक दिवस मी तिच्या जीवनावर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीन.’(Bigg Boss 14 fame Actress Rakhin Sawant share Nagin funny video)

वादाच्या भोवऱ्यात राखी सावंत

नुकतेच राखीवर एका व्यक्तीने पैसे लुबाडल्याचा आरोप केला होता. अहवालानुसार राखी सावंत यांच्या जवळच्या स्रोताने सांगितले की, अभिनेत्री यामुळे निराश झाली आहे आणि तिच्यावर होत असलेला हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. शैलेश श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीला ती ओळखत देखील नाही. राखीचा जवळचा मित्र म्हणतो की, बिग बॉस नंतर पुन्हा एकदा राखीच्या कारकीर्दीला वेग आला आहे, अशा परिस्थितीत केवळ तिचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिचे कुटुंब लवकरच या संदर्भात निर्णय घेईल.

सध्या राखी सावंत या प्रकरणी मदतीसाठी बर्‍याच लोकांची भेट घेत आहे आणि आईची काळजीही घेत आहे. तर या प्रकरणावर बोलताना ती म्हणाली की, जर 2017 मध्ये एखाद्याची फसवणूक झाली असेल, तर तो इतके दिवस कशाची वाट पाहत होता? तो कायदेशीर खटला दाखल करण्यासाठी बिग बॉसच्या समाप्तीची वाट पहात होता का? आम्ही या प्रकरणात आता कायदेशीररित्या निर्णय घेणार आहोत.

(Bigg Boss 14 fame Actress Rakhin Sawant share Nagin funny video)

हेही वाचा :

Alia Bhatt | रणबीर कपूर-संजय लीला भन्साळींना कोरोना, आलियाही घाबरली! स्वतःला केले क्वारंटाईन

Disha Patani | ‘ये लडकी है या आग’, दिशा पाटनीचा जबरदस्त स्टंट सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडीओ…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI