AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतिक रोशनने शेअर केला सबा आझाद आणि इमाद शाहचा फोटो, म्हणाला…

हृतिकने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी ठेवली आहे. त्यामुळे सिनेवर्तुळात पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह आणि सबा यांचा एकत्र फोटो आहे.

ऋतिक रोशनने शेअर केला सबा आझाद आणि इमाद शाहचा फोटो, म्हणाला...
इमाद शाह, सबा आझाद, ऋतिक रोशन
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 26, 2022 | 10:56 AM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडौमोडींमुळे मागच्या काही दिवसांपासून भलताच चर्चेत आहे. हृतिक आणि गायिका, अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातंय. एकदा हृतिक आणि सबा एकमेकांचा हात धरून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. हृतिकने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी ठेवली आहे. त्यामुळे सिनेवर्तुळात पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांचा मुलगा इमाद शाह (Imamad Shah) आणि सबा यांचा एकत्र फोटो आहे. इमाद आणि सबा रिलेशनशिपमध्ये होते असं बोललं जातं. आता हृतिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये इमादाच फोटो असल्यावर चर्चा तर होणारच ना!

हृतिक रोशनची इन्स्टाग्राम स्टोरी

हृतिकने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी ठेवली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह आणि सबा यांचा एकत्र फोटो आहे.सबा आणि इमाद यांचा पुण्यात एक कार्यक्रम होणार आहे. याबाबत सबाने तिच्या इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली होती. यात तिने इमादसोबत एक फोटो शेअर केलाय. हीच स्टोरी हृतिकने रिशेअर केली आहे. इमाद आणि सबा रिलेशनशिपमध्ये होते असं बोललं जातं. आता हृतिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये इमादाच फोटो असल्याने सिनेवर्तुळात पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे.

सबा आझाने मानले आभार

हृतिकच्या या स्टोरीला सबाने शेअर केलं आहे आणि हृतिकचे आभार मानले आहेत. “थँक्यू हृतिक” असं सबा म्हणाली आहे.

सबा कोण आहे?

सबा आझाद ही एक गायिका आणि अभिनेत्री आहे. यासोबतच ती एका बँडचाही एक भाग आहे. याआधी ती नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जातं. हृतिकची पूर्व पत्नी सुझैन खानलाही सबा आवडते, काही दिवसांआधी सुझैनने सबाचा एक फोटो इन्स्टाग्नामवर शेअर केला होता.

संबंधित बातम्या

“गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन, एवढे पैसे आले कुठून?, युट्यूबर गणेश आणि योगिता शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण

‘गंगुबाई’चा थिएटरात कल्ला, पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, तिकीटही मिळेना!

राखीच्या डान्सचं चाहत्यांकडून कौतुक; कोणत्या गाण्यावर डान्स केलाय तुम्हाला माहित आहे का ?

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...