ऋचा चड्ढा हिच्या समर्थनार्थ प्रकाश राज यांचा अक्षय कुमारवर निशाणा

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Nov 26, 2022 | 8:20 PM

अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

ऋचा चड्ढा हिच्या समर्थनार्थ प्रकाश राज यांचा अक्षय कुमारवर निशाणा

मुंबई : ऋचा चड्ढाने गलवालबाबत एक वादग्रस्त विधान केले. ज्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ती प्रचंड चर्चेत आलीये. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, ऋचाचा चांगलाच समाचार घेतलाय. यामध्ये अनुपम खेर आणि अक्षय कुमार यांनी ऋचाच्या विधानावर तिला खडेबोल सुनावले आहेत. अक्षय कुमारने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि म्हटले की, ते आहेत म्हणूनच आपण आहोत. अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.

सर्वजण ऋचा चड्ढाविरोधात संताप व्यक्त करत असताना अभिनेते प्रकाश राज ऋचासाठी मैदानात उतरले आहे. ऋचाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली आहे.

ऋचा चड्ढाने जरी माफी मागितली तरीही लोक तिच्याविरोधात पोस्ट शेअर करत आहेत. अनेकांच्या रोषाला ऋचाला सध्या सामोरे जाण्याची वेळी आलीये. प्रकाश राज यांनी ऋचा चड्ढाचे समर्थन केल्याने अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत.

प्रकाश राज यांनी ऋचा चड्ढाचे समर्थन करत अक्षय कुमारवर निशाणा साधला. ऋचाला ट्रोल करणाऱ्या ट्विटवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश राज यांनी लिहिले की, अक्षय कुमार तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती… ऋचा चढ्ढा तुझ्यापेक्षा अधिक समर्पक बोलली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI