बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने सलमान खान याला दिलेली धमकी, साहेलही बोललेला मी मध्ये नाही पडणार
बॉलिवुडचा भाईजान सलमान खानचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा पाहायला मिळतो. सलमान खानला बॉलिवुडच्या एका अभिनेत्याने मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी सलमानचा भाऊ सोहलेही त्याला बोललेला की मी मध्ये पडणार नाही, नेमकं काय झालं होतं जाणून घ्या.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बॉलिवूडमध्ये दबंग खान म्हणून देखील ओळखले जाते. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. चाहत्यांचे कायमच सलमान खानच्या चित्रपटांना प्रेम मिळताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी तूफान रंगताना दिसली.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप एका वाईट वळणावर झाले. सलमान खान याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय ही विवेक ओबेरॉय याला डेट करत होती. मात्र, हे सलमान खानला अजिबातच पटले नाही. यानंतर विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यामध्ये जोरदार वाद बघायला मिळाला. हेच नाही तर विवेक ओबेरॉय याने एक पत्रकार परिषद घेत सलमान खानवर गंभीर आरोपही केले होते.
सलमान खान याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही विवेक ओबेरॉय याने म्हटले होते. विवेक ओबेरॉय याने म्हटले होते की, मला जीवे मारण्याच्या अनेकदा सलमान खानने धमक्या दिल्या. हेच नाही तर शिवीगाळही करत होता. रात्री साडेचार तासामध्ये सलमानने मला 41 वेळा कॉल केले होते आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
यासर्व प्रकारानंतर मी सलमान खानचा भाऊ सोहेलकडे याबद्दलची तक्रार केली होती आणि त्याला समजावून सांगण्यासही सांगितले होते. हा जर प्रकार सलमानने थांबवला नाही तर त्याला मी मारेल असेल, विवेक ओबेरॉय याने सांगितले होते. सोहेल त्यावेळी मला म्हणाला होता की, ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपमुळे तो खूप जास्त त्रस्त आहे आणि नशेत असल्याने तो असा बोलला असावा.
विवेक ओबेरॉय म्हणाला होता की, या प्रकरणात सोहेल खान याने आपल्याला सपोर्ट केला होता. सलमान खान खूप जास्त नाराज असल्याने तो असे करत आहे, असेही सोहेलने म्हटले होते. जर सलमानने तुझ्या घराबाहेर येत गोंधळ घातला तर तुला जे योग्य वाटेल ते कर, यामध्ये आपली मैत्री कुठेच खराब होणार नाही. तू कायमच माझा चांगला मित्र राहणार असेही सोहेलने म्हटले होते.
