
टीव्ही आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री करिष्मा शर्मा हीने सोशल मीडियाद्वारे तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेची माहिती शेअर केली आहे. करिष्माने तिचा मुंबई लोकलमधून प्रवास करताना अपघात झाल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करिष्मा पश्चिम रेल्वे मार्गावरुन मित्रांसोबत प्रवास करत होती. करिष्मा रेल्वेत चढली. मात्र इतक्यात रेल्वेचा वेग वाढला. त्यामुळे तिच्या सोबत असलेल्या मित्रांना लोकल रेल्वे पकडता आली नाही. त्यामुळे करिष्मा घाबरली. घाबरलेल्या करिष्माने धावत्या लोकलमधून उडी मारली. त्यामुळे अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. करिष्माला या अपघातात दुखापत झाली आहे. सध्या अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अभिनेत्रीने तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी, असं आवाहन करिष्माने इंस्टा स्टोरीद्वारे चाहत्यांना केलं आहे.
“मी काल चर्चगेटला शूटनिमित्ताने जाण्यासाठी साडी नेसून जायचं असं ठरवलं. मी सर्वकाही ठरवल्यानुसार रेल्वेत चढले. रेल्वेचा वेग वाढला. त्यामुळे माझ्या सोबतच्या मित्रांना गाडी पकडता आली नाही. त्यामुळे मी घाबरले. मी भीतीपोटी उडी मारली. मी पाठीवर पडले. त्यामुळे माझ्या डोक्याला मार लागला”, अशी माहिती अभिनेत्रीने इंस्टा स्टोरीद्वारे दिली.
“मला 1 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. मला कालपासून फार वेदना होत आहेत. मात्र मी धीट आहे. मी यातून लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा”, असं आवाहन अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना केलं.
अभिनेत्री करिष्मा शर्मा हीची व्हायरल इंस्टा स्टोरी
Karishma Sharma Accident Insta Story
अभिनेत्रीसोबत झालेल्या या अपघातामुळे तिच्या चाहत्यांनाही झटका बसला आहे. आपली लाडकी अभिनेत्री लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान करिष्माच्या मैत्रीणीने अभिनेत्रीचा हॉस्पिटलमधील एक फोटो पोस्ट केला आहे. करिष्माच्या मैत्रीणीने या फोटोद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “करिष्मासोबत असं काही झालंय यावर विश्वास बसत नाहीय. माझी मैत्रीण रेल्वेतून पडली. तिला काहीच आठवत नाहीय. करिष्माला आम्ही उचलून इथे आणलंय. डॉक्टर आताही अधिक तपास करत आहेत. लवकर बरी हो”, अशा भावना मैत्रीणीने व्यक्त केल्या.