AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा ‘या’ कारणामुळे रडली ढसाढसा, पती झहीर इक्बाल याच्यासोबत…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा 'या' कारणामुळे रडली ढसाढसा, पती झहीर इक्बाल याच्यासोबत...
Sonakshi Sinha
| Updated on: Sep 26, 2024 | 4:17 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सात वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. झहीर आणि सोनाक्षीची पहिली भेट ही सलमान खानच्या घरी झाली. हेच नाही तर पहिल्याच भेटीमध्ये अनेक तास हे दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत बसले होते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अगोदर सिव्हील मॅरेज केले आणि त्यानंतर मुंबईमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार देखील पोहोचले.

सुरूवातीला सांगितले जात होते की, सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला सिन्हा कुटुंबाकडून जोरदार विरोध आहे. परंतू, लग्नामध्ये सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात धरल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसत होते. सोनाक्षी सिन्हा ही झहीरसोबतच्या लग्नानंतर सतत हनिमूनवर जाताना दिसत आहे. सोशल मीडियावरही सोनाक्षी सिन्हा सक्रिय दिसत आहे.

आता नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे इंडिया बेस्ट डांसर सीजन 4 च्या मंचावर पोहोचले. आता त्याचाच एक प्रोमोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये ढसाढसा रडताना सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे. यामध्ये एक डान्स पाहून सोनाक्षी सिन्हा ही भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

यासोबतच सोनाक्षीने झहीरसोबत रोमांटिक डान्स देखील केला. सोनाक्षी सिन्हा हिने एक पोस्ट सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून सांगण्यात आले की, तिला आज तिच्या आई वडिलांच्या घराची खूप जास्त आठवण येत आहे. हेच नाही तर सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, आज तिच्या खरी खास कढी करण्यात आली.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाचे अनेक खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. जबरदस्त लूकमध्ये सोनाक्षी सिन्हा ही दिसली. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. सोनाक्षी सिन्हाने सलमान खान याच्यासोबत देखील धमाकेदार काम केले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?