AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रींचा भरला संसार मोडला, लग्न, घटस्फोट, पुन्हा लग्न, प्रचंड बॅड पॅचमधून जावं लागलं

चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनेक मुलींसाठी प्रेरणा असतात. अनेक अभिनेत्री या आपल्या आयुष्यात यशस्वी देखील होतात. पण त्यांना यश तितक्या सहजासहज मिळालेलं नसतं. त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मग ते अभिनय, चित्रपट क्षेत्र असो किंवा वैयक्तिक आयुष्य असो, त्यांना सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्या परिस्थितीशी दोन हात करतात आणि यशस्वी होतात. आम्ही आज अशाच काही अभिनेत्रींची माहिती देणार आहोत, ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात लग्न मोडण्यासारखं मोठं वादळ येऊन गेलं, पण त्यांनी परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतला आणि त्या आयुष्यात यशस्वी झाल्या.

अभिनेत्रींचा भरला संसार मोडला, लग्न, घटस्फोट, पुन्हा लग्न, प्रचंड बॅड पॅचमधून जावं लागलं
| Updated on: Dec 16, 2023 | 11:18 AM
Share

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या नियतीच्या हातात असतात. काही लोकांकडे कला असते, त्यांना कलेचं वरदान मिळालेलं असतं. पण तरीही त्यांचं आयुष्य काही कारणास्तव रितं होऊन बसतं. आयुष्यात योग्य जोडीदार मिळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर असंच रितं पडलेलं आयुष्य जगावं लागतं. हे रितं आयुष्य एकटेपणाची जाणीव करुन देत राहतं. त्यातून माणूस नैराश्यात जातो. पण या नैराश्यावर मात करण्यासाठी आपण कलेची साधना करायला हवी किंवा इतर काही चांगले मार्ग अवलंबले पाहिजेत. आयुष्यात पुढे जाण्यासाठी दुसरा जोडीदार शोधायला हवा. काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी तसे प्रयोग करुनही पाहिले. पण त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकटं पडण्याची परिस्थिती आली. तर काहीचं वैवाहिक आयुष्य समृद्ध झालं. आम्ही तुम्हाला आज अशाच काही दिग्गज अभिनेत्रींची माहिती देणार आहोत.

नीलिमा अझीम यांचं तीन वेळा लग्न मोडलं

नीलिमा अझीम या प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरची आई आहेत. त्यांनी 1979 मध्ये अभिनेते पंकज कपूर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी शाहीद कपूरचा जन्म झाला होता. पण त्यानंतर नीलिमा यांचं पंकज कपूर यांच्यासोबतचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. पंकज कपूर यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नीलिमा यांना एकटेपणाची जाणीव झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्या आयुष्यात अभिनेते राजेश खट्टर आले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. हे लग्न 1990 ते 2001 असं 11 वर्ष टिकलं. या दाम्पत्याने एका मुलाला जन्म दिला. या मुलाचं नाव इशान खट्टर आहे जो बॉलिवूडचा आजच्या काळातला तरुण चेहरा आहे. इशानने धडक चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. राजेश खट्टर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नीलिम यांनी रझा अली खान यांच्याशी तिसरं लग्न केलं. पण ते फक्त पाच वर्ष टिकलं. 2004 ते 2009 या दरम्यान नीलम आणि रझा अली खान हे पती-पत्नी होते.

किरण खेर यांचं दोन वेळा लग्न

प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांना कोण ओळखत नाही. नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन मालिका, गायन अशा अनेक क्षेत्रांमध्ये नामलौकीक असलेल्या किरण खेर यांनीदेखील आपल्या आयुष्याच दोनवेळा लग्न केलं आहे. किरण यांनी 1979 साली मुंबईतील उद्योगपती गौतम बैरी यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. या दाम्पत्याला सिकंदर नावाचा मुलगा आहे जो बॉलिवूड अभिनेता आहे. पण किरण यांनी 1985 मध्ये गौतम बेरी यांना घटस्फोट दिला आणि प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत लग्न केलं होतं.

किरण खेर आपले पती अनुपम खेर यांच्यासोबत

नीलम कोठारी यांचं दोन वेळा लग्न

प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी यांनीदेखील दोन लग्न केले आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2000 मध्ये ऋषी सेठाई यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांचं बिनसलं आणि त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर नीलम यांनी 2011 मध्ये अभिनेता समीर सोनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दाम्पत्याने एखा मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव अहाना असं आहे.

श्वेता तिवारीचं दोन वेळा लग्न, पण दोन्ही नाती टिकली नाहीत

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी हिला कोणी ओळखणार नाही, असं क्वचितच घडेल. श्वेताने 1998 मध्ये राजा चौधरी यांच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांना पलक तिवारी म्हणून मुलगी देखील आहे. दाम्पत्याने 2007 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला होता. श्वेता तिवारी हिने त्यानंतर 13 जुलै 2013 अभिनेता अभिनव कोहली याच्यासोबत केलं होतं. दाम्पत्याने एका मुलाला जन्म दिला होता. पण काही वर्षांनी दोघांचं बिनसलं. श्र्वेताने अभिनवच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. अखेर 2017 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

तानाझ इरानी

अभिनेत्री तानाझ इरानी टिव्ही सिरियल आणि अनेक चित्रपटांमध्ये बघायला मिळाली आहे. तानाझ हिने फरीद करीम सोबत पहिलं लग्न केलं होतं. पण लग्नानंतर काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तानाझने दुसरं लग्न 2006 मध्ये अभिनेता भक्तियार इराणी यांच्यासोबत केलं होतं.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.