AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan: भर कार्यक्रमात आमिरने विचारलं ‘गॉडफादर’मध्ये माझ्याऐवजी सलमानला का निवडलं? चिरंजीवी यांनी दिलं प्रामाणिक उत्तर

आमिरने त्यांना गंमतीने विचारलं की, त्यांच्या 'गॉडफादर' या चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्यांनी सलमानऐवजी आपली निवड का नाही केली?

Aamir Khan: भर कार्यक्रमात आमिरने विचारलं 'गॉडफादर'मध्ये माझ्याऐवजी सलमानला का निवडलं? चिरंजीवी यांनी दिलं प्रामाणिक उत्तर
Aamir Khan: भर कार्यक्रमात आमिरने विचारलं 'गॉडफादर'मध्ये माझ्याऐवजी सलमानला का निवडलं? Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 6:04 PM
Share

बॉलिवूडचा दबंग सलमान खान लवकरच साऊथ सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांच्या ‘गॉडफादर’ (Godfather) चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान तेलगू मेगास्टार चिरंजीवी यांनी या भूमिकेसाठी आमिर खानच्या (Aamir Khan) ऐवजी सलमानची निवड का केली याचा खुलासा केला आहे. चिरंजीवी यांनी नुकताच हैदराबादमध्ये आमिरच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचा तेलुगू ट्रेलर लाँच केला. या कार्यक्रमादरम्यान आमिरने चिरंजीवी यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल सांगितलं. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल चिरंजीवी यांचे आभार मानून आमिर म्हणाला की भविष्यात संधी मिळाल्यास त्यांच्या एखाद्या चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल. यादरम्यान आमिरने त्यांना गंमतीने विचारलं की, त्यांच्या ‘गॉडफादर’ या चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्यांनी सलमानऐवजी आपली निवड का नाही केली?

आमिरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना, चिरंजीवी यांनी सांगितलं की चित्रपटातील पात्रासाठी शारीरिक क्षमता असलेल्या व्यक्तीची गरज होती, म्हणून त्यांनी सलमानला ती ऑफर दिली. सलमान गॉडफादर या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याचा विस्तारित कॅमिओ असणार आहे. या चित्रपटात सलमानसोबतच नयनतारा आणि सत्यदेव कंचराना यांच्याही भूमिका आहेत.

पहा व्हिडीओ-

आमिर खान लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटापूर्वी तो ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये दिसला होता. उत्तम ओपनिंग करूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. सध्या आमिर त्याच्या आगामी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, मोना सिंग, नागा चैतन्य देखील दिसणार आहेत. येत्या 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.