AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याचा लुंगी घालून डान्स, माजी क्रिकेटपटू भडकला, ‘येंतम्मा’ गाण्यावर बंदीची मागणी; काय आहे प्रकरण?

अभिनेता सलमान खानच्या एका गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या गाण्यात त्याने लुंगी नेसल्याने त्यावर एका माजी क्रिकेटपटून आक्षेप घेतला आहे. या क्रिकेटपटूने गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सलमान खान याचा लुंगी घालून डान्स, माजी क्रिकेटपटू भडकला, 'येंतम्मा' गाण्यावर बंदीची मागणी; काय आहे प्रकरण?
salman khanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 10, 2023 | 3:00 PM
Share

नवी दिल्ली : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘येंतम्मा’ हे गाणं प्रसिद्ध झालं आहे. अभिनेता सलमान खान, वेंकटेश दग्गुबाटी, राम चरण आणि पूजा हेगडेवर हे गाण चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात सलमान खान, राम चरण आणि वेंकटेश हे पिवळे शर्ट आणि सफेद धोतीत डान्स करताना दिसत आहेत. विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणं गायलं आहे. तर शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. मात्र, या गाण्यावर माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आक्षेप घेतला आहे. इतकेच नव्हे तर या गाण्यातून आमच्या संस्कृतीची बदनामी होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शिवरामकृष्णन यांनी केली आहे.

एका ट्विटर यूजरने या गाण्याची एक क्लिप शेअर केली आहे. या गाण्यात सलमान खान डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर लक्ष्मण यांनी ट्विट करून आक्षेप घेतला आहे. हे गाणं अत्यंत अनुचित आहे. यातून आमच्या दक्षिण भारतीय संस्कृतीला अपमानित केलं जात आहे. ही एक लुंगी नाही. ही धोती आहे. हे एक वस्त्र आहे. ते अत्यंत किळसवाण्या पद्धतीने गाण्यात दाखवलं गेलं आहे, असं लक्ष्मण यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण यांच्या या प्रतिक्रियेवर एका यूजर्सने ट्विट करत कमेंट केली आहे. मंदिर परिसरात जोडे घालून… रेटिंग देऊच नये, असं म्हटलं आहे.

त्यांना हे कळत नाही का?

या प्रतिक्रियेवर लक्ष्मण यांनी रिप्लाय दिला आहे. आजकाल लोक पैशासाठी काहीही करतात. लुंगी आणि धोतीत फरक आहे हे या लोकांना कळत नाही का? हा सिनेमाचा सेट असला तरी तो मंदिराच्या रुपात दाखवला जात आहे. मंदिर परिसरात जोडे घालत नसतात हे सिनेमाशी संबंधित लोकांना समजलं पाहिजे. @CBFC_India विनंती आहे की त्यांनी या गाण्यावर बंदी आणावी. त्यावर विचार करा, असं लक्ष्मण यांनी म्हटलं आहे.

वीरमचा रिमेक

फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा अजित कुमार यांच्या ‘वीरम’ या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंह, अभिमन्यू सिंह, रघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.