Disha Patani | सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’मध्ये दिशा पाटनीची एण्ट्री, मोठ्या पडद्यावर दिसणार धमाकेदार अ‍ॅक्शन!

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) याच्या 'योद्धा' (Yodha) या चित्रपटात दिशा पाटनीची (Disha Patani) एन्ट्री झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून याबाबत चर्चा झाल्यानंतर अखेर दिशानेच याची घोषणा केली आहे. यासोबतच हिरो सिद्धार्थ आणि 'योद्धा' चित्रपटाच्या निर्मात्यांनीही तिचे स्वागत केले आहे.

Disha Patani | सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’मध्ये दिशा पाटनीची एण्ट्री, मोठ्या पडद्यावर दिसणार धमाकेदार अ‍ॅक्शन!
Disha Patani
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 18, 2021 | 3:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) याच्या ‘योद्धा’ (Yodha) या चित्रपटात दिशा पाटनीची (Disha Patani) एन्ट्री झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून याबाबत चर्चा झाल्यानंतर अखेर दिशानेच याची घोषणा केली आहे. यासोबतच हिरो सिद्धार्थ आणि ‘योद्धा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनीही तिचे स्वागत केले आहे. या चित्रपटात दिशा व्यतिरिक्त अभिनेत्री राशी खन्ना देखील दिसणार आहे.

दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘योद्धा’चे पोस्टर शेअर करताना दिशा पाटनीने लिहिले की, ‘या अॅक्शन-पॅक्ड प्रवासाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. मी धमाका करायला तयार आहे मित्रांनो, चला! 11 नोव्हेंबर 2022 रोजी #योद्धा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिशा पाटनीचे वर्णन ‘जबरदस्त’ असे करण्यात आले आहे. म्हणजे दिशाची भूमिका दमदार असणार आहे. तसेच, दिशा या चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

राशी खन्नाही महत्त्वपूर्ण भूमिकेत!

या चित्रपटात दिशा व्यतिरिक्त अभिनेत्री राशी खन्ना देखील या चित्रपटात दिसणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा नायक सिद्धार्थ मल्होत्रासोबत याची घोषणा केली होती. राशीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही माहिती शेअर केली आणि लिहिले की, ‘मी ‘योद्धा’च्या टीममध्ये सामील झाले आहे, हे सांगताना मला खूप सन्मान आणि उत्साहित वाटत आहे.’

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

राशी खन्ना हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने जॉन अब्राहमच्या ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. दिग्दर्शक राज आणि डीके यांच्या आगामी वेब सीरीजमध्येही ती काम करत आहे. अजय देवगणच्या ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरीजचाही ती एक भाग बनली आहे. दुसरीकडे दिशा पाटानी ‘योद्धा’ व्यतिरिक्त ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे.

‘योद्धा’ चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा करत आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली करण जोहर याची निर्मिती करत आहे. ‘योद्धा’ हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनची पहिली अॅक्शन फ्रँचायझी असणार आहे. ‘योद्धा’ चित्रपटाची कथा विमान अपघाताशी संबंधित असेल. तसेच, ‘योद्धा’ व्यतिरिक्त अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिग्दर्शक शंतनू बागचीच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें