हा कधीच चांगला नवरा होऊ शकत नाही; ऐश्वर्यासाठी चाहते हळहळले
ऐश्वर्या राय बच्चनच्या 51 व्या वाढदिवसाला अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंबाकडून कोणतीही शुभेच्छा न मिळाल्याने चाहत्यांमध्ये संताप आहे. अभिषेकने स्वतःच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं, पण ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या नाहीत असं म्हणत नेटकऱ्यांनी अभिषेकला ट्रोल केलं आणि ऐश्वर्यासाठी हळहळ व्यक्त केली आहे.

मिस वर्ल्ड अन् बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने नुकताच तिचा 51वा वाढदिवस साजरा केला. पण तिच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबातील कुणीही सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या नसल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यांमुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. पण यामुळे चाहते मात्र नाराज झाले आहे. यावरून अनेकांनी अभिषेकला खडे बोलही सुनावले.
नेटकऱ्यांचा अभिषेकवर संताप
ऐश्वर्याच्या वाढदिवासाला तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्यात. मात्र बच्चन कुटुंबाची कोणतीही प्रतिक्रिया यावर समोर आली नाही. तर चाहत्यांनी आवर्जून अभिषेक आणि बच्चन कुटुंबियांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन पाहिले की त्यांनी ऐश्वर्यासाठी काहीतरी पोस्ट केलं असेल किंवा शुभेच्छा दिल्या असतील. पण अर्थातच चाहत्यांचा हिरमोड झाला. कारण कोणाच्याच अकाउंटवरून ऐश्वर्याच्या वाढदिवासाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या नव्हत्या, नाही कोणती पोस्ट करण्यात आली होती. हे पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली

Aishwarya Rai Abhishek divorce
चाहत्यांनी किमान अभिषेकडून तरी अपेक्षा व्यक्त केली होती की, तो तरी त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल. पण तसं न होता त्याने त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं. हे पाहून चाहत्यांनी अभिषेकवर संताप व्यक्त केला. अनेकांनी कमेंटमध्ये हेही म्हटलं की, ” आम्ही आवर्जून पाहायला आलो होतो की तू ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या की नाही”,अशा पद्धतीच्या अनेक कमेंटसमधून नेटकऱ्यांना अभिषेकला ट्रोल केलं आहे.
ऐश्वर्यासाठी हळहळ व्यक्त
अभिषेकच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटलं आहे” कसा माणूस आहेस, तुझ्या पत्नीला किमान वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी दे”, एकाने म्हटलं आहे ” मला विश्वास नाही बसत आहे की तिने तुझ्याशी लग्न केलं”, तर, एका युजरने म्हटलं “या व्यक्तीकडून खूप नकारात्मक उर्जा जाणवत आहे”, एका नेटकऱ्यांन अभिषेकला ‘अयशस्वी नवरा’ असं म्हणत अभिषेकला ट्रोल तर ऐश्वर्यासाठी हळहळ व्यक्त केली आहे.
- Aishwarya Rai Abhishek divorce
अभिषेकने पत्नीला शुभेच्छा न दिल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस होता. तेव्हाही ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरुच होत्या मात्र तेव्हा ऐश्वर्याने आवर्जून अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मग अभिषेक आपल्या पत्निला साध्या शुभेच्छा पण देऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न विचारत चाहत्यांनी अभिषेकवर राग व्यक्त केला आहे.
- Aishwarya Rai Abhishek divorce
दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अद्यापही बच्चन परिवार किंवा ऐश्वर्याकडूनही कोणत्याच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. पण आजही चाहत्यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक हे कायम एकत्रच राहावे अशी मनापासून इच्छा व्यक्त केली आहे.