AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Kashyap | आधी छातीत वेदना आता अँजियोप्लास्टी, अनुराग कश्यपने दिली स्वतःच्या तब्येतीची अपडेट

प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap)  याची मुंबईतील एक रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखण्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Anurag Kashyap | आधी छातीत वेदना आता अँजियोप्लास्टी, अनुराग कश्यपने दिली स्वतःच्या तब्येतीची अपडेट
अनुराग कश्यप
| Updated on: May 27, 2021 | 5:33 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap)  याची मुंबईतील एक रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखण्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि आता त्याच्या तब्येत आता सुधारणा होत आहे. त्याची प्रकृती आता सुधारत आहे (Film Producer Anurag kashyap undergoes angioplasty).

एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात अनुरागच्या छातीत दुखत होते. त्यानंतरच त्याने आपले चेकअप करण्याचा निर्णय घेतला. या चेकअप दरम्यान अँजिओग्राफीवरून असे दिसून आले की, त्याच्या हृदयात काही ब्लॉकेज असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर तातडीने त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अनुराग कश्यपच्या प्रवक्त्याने चित्रपट निर्मात्याच्या शस्त्रक्रियेच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की, तो आता बरा झाला आहे. डॉक्टरांनी त्याला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर तो पुन्हा कामावर परत येईल.

अनुरागच्या घरावर आयटी रेड

यावर्षी मार्च महिन्यात चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयटी रेड पडली होती. हा छापेमारी सतत तीन दिवस सुरु होती. त्यांच्या मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांवर छापा टाकण्यात आला होता. 2 राज्यांच्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. यातील तीन जण यूपीहून आणि तीन महाराष्ट्रातून आले होते. पुण्यातील हॉटेलमध्ये अनुराग कश्यप याचा जबाबही नोंदवला गेला होता. त्या दरम्यान त्याचा फोन देखील जप्त करण्यात आला होता. इतकेच नाही तर, अनुरागचे लॅपटॉप व फोन देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत (Film Producer Anurag kashyap undergoes angioplasty).

अनुरागची लेकही चिंतेत

अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. ती तिच्या मानसिक आरोग्याबद्दल सोशल मीडियावर उघडपणे बोलत असते. तिनेच काही दिवसांपूर्वी व्हिडीओ शेअर केला होता आणि सांगितले होते की, ती सध्या खूप तणावात आहे. ज्यामुळे तिलादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अनुराग कश्यप पुन्हा एकदा तापसी पन्नू बरोबर एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात पवेल गुलाटी तापसीसह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या साय-फाय थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग यावर्षी मार्चमध्ये संपले आहे. अनुराग आणि तापसी यांनी यापूर्वी ‘मनमर्जियां’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

(Film Producer Anurag kashyap undergoes angioplasty)

हेही वाचा :

PHOTO | ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमचा आरोग्यमंत्र, सेटवर सुरुय व्यायामाचं सत्र!

Video | ‘अय्ययो….’ राणीच्या गाण्यावर सई लोकूरची धमाल, दाक्षिणात्य तडक्यासह डान्सिंग अंदाज चर्चेत!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.