AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra | जामिनावर बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रा माध्यमांसमोर, शिल्पा शेट्टीचा हात पकडून केले देवदर्शन!

श्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्रा (Raj Kundra) तुरुंगात गेल्यानंतर त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पती राज याला घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंनी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

Raj Kundra | जामिनावर बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रा माध्यमांसमोर, शिल्पा शेट्टीचा हात पकडून केले देवदर्शन!
Shilpa Shetty-Raj Kundra
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 09, 2021 | 4:25 PM
Share

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्रा (Raj Kundra) तुरुंगात गेल्यानंतर त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पती राज याला घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंनी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. अश्लील चित्रपट प्रकरणी अटक आणि जामिनानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर दिसले.

राज कुंद्रा याला जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले होते. तब्बल दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर सप्टेंबरमध्ये तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा कुठेही सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. सध्या, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या पहिल्या सार्वजनिक अपिरीयंसबद्दल बोलायचे तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून दिसत आहेत. हे फोटो हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील आहेत, जिथे दोघे मंदिरातून बाहेर पडताना एकत्र स्पॉट झाले होते.

पाहा फोटो :

शिल्पा आणि राज यांनी धर्मशाळेतील ‘या’ मंदिराला एकत्र भेट दिली!

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दोघांनीही यावेळी मॅचिंग कपडे घातले होते. राज कुंद्राने पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा घातला होता, तर शिल्पा शेट्टी पिवळी सलवार आणि कमीज परिधान केली होती. दोघांनी मिळून श्री ज्वालामुखी शक्तीपीठाला भेट दिली आणि माँ दुर्गाकडे सर्वांचे आरोग्य चांगले राहो, अशी मागणी मागितली. यावेळी राज कुंद्रा आणि शिल्पा दोघांनाही त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी घेरलेले दिसले. तिथे उपस्थित काही लोकांनी दोघांसोबत फोटोही काढले.

हे फोटो समोर येण्यापूर्वी शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर धर्मशाळेतील या मंदिराला भेट देताना काही व्हिडीओ शेअर केले होते. मात्र, या व्हिडीओंमध्ये राज कुंद्रा तिच्यासोबत कुठेही दिसत नव्हता. कदाचित मुद्दाम शिल्पाने राज कुंद्रासोबतचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर केले नव्हते. कारण, तिला पुन्हा ट्रोल होण्याची भीती वाटत होती.

हे फोटो समोर आल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, शिल्पा शेट्टी अजूनही तिचा पती राज कुंद्राच्या प्रेमात आहे. अश्लील चित्रपट प्रकरण दोघांच्या नात्यामध्ये अंतर आणू शकले नाही आणि हे फोटो दोघे वेगळे होणार असल्याच्या बातम्यांचे खंडनही करतात.

हेही वाचा :

लिटिल चॅम्प्सच्या गाण्याने उषा मंगेशकर प्रभावित, लता दीदींना केली चिमुकल्यांची गाणी ऐकण्याची विनंती!

Aai Kuthe Kay Karte | आशुतोष केळकर अरुंधतीच्या आयुष्यात आणणार आशेचा नवा किरण, वाचा मालिकेत पुढे काय घडणार?

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!