करीना कपूरपासून ते सारा खानपर्यंत… अभिनेत्री या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, केस गळू लागतात अन्..
करीनापासून ते सारा अली खानपर्यंत अनेक अभिनेत्री या गंभीर आजाराने त्रस्त आहेत.एवढंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आजाराबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे आणि त्यावर उपचारही ते करत आहेत.

बॉलिवूडमधील अभिनेत्री आपल्या डाएट आणि आहाराबाबत किती काळजी घेतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे डाएट फॉलो करत असतात. त्यांचासारखे वर्कआउटही करण्याचा प्रयत्न करतात. जेणे करून त्यांनाही याचा फायदा नक्की होईल. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या वर्कआउट, डाएटबद्दल नेहमी त्यांच्या सोशल मीडियावर माहिती देतच असतात. त्यात बरेचजण करीना कपूर, आलिया कपूर, शिल्पा शेट्टी अशा अभिनेत्रींना फॉलो करतात. एवढं डाएट आणि वर्कआउटची काळजी घेत असतानाच अनेक अभिनेत्री एका आजाराने ग्रस्त आहेत.
करीनानेदेखील तिच्या आजाराबद्दल अगदी उघडपणे सांगितलं आहे
करीनानेदेखील तिच्या आजाराबद्दल अगदी उघडपणे सांगितलं आहे. हा आजार म्हणजे पीसीओएस. या आजाराने अनेक अभिनेत्री आणि सामान्य महिला देखी त्रासल्या आहेत. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, करीना तिच्या आहाराची काळजी घेते, चांगली झोप घेण्याचा, दररोज व्यायाम करण्याचा आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करते. पायांना येणारे गोळे टाळण्यासाठी ती कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी12 घेते
सारा अली खानने देखील या आजाराचा तिचा प्रवास सांगितला
सारा अली खानने देखील करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये तिच्या पीसीओएस प्रवासाबद्दल सांगितले. ते नीट करण्यासाठी, साराला खूप मेहनत करावी लागली होती. तसेच ती आताही खूप कसरत करते आणि निरोगी आहाराची मदत घेते जेणेकरून ती स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकेल.
सोनम कपूरला तर किशोरावस्थेत झाला हा आजार
सोनम कपूरला तर किशोरावस्थेत पीसीओएस होता, त्यामुळे काही महिन्यांतच तिचे वजन 35 किलो वाढले. एवढेच नाही तर चेहऱ्यावरील केस आणि मुरुमांची समस्याही वाढली होती. पण आता सोनम कपूरने निरोगी जीवनशैलीने त्यावर नियंत्रण मिळवले आहे.
श्रुती हसनलाही याचा त्रास
श्रुती हसनलाही पीसीओएसचा त्रास आहे. एका मुलाखतीत तिने तिचे वजन कसे वाढले हे सांगितले. या आजारामुळे तिचे केसही गळू लागले होते. तिला मूड स्विंगचा त्रास होत होता. पण श्रुती आता पीसीओएसचे व्यवस्थापन करत आहे.
मसाबा फक्त घरी शिजवलेले निरोगी अन्न खाते
सोशल मीडियावर सक्रिय असलेली मसाबा गुप्ता देखील पीसीओएस रुग्ण आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अभिनेत्री सकाळी योगा आणि व्यायाम करते. मसाबा फक्त घरी शिजवलेले निरोगी अन्न खाते. यामुळे तिचे वजन नियंत्रणात राहते.
तर अशापद्धतीने निरोगी जीवनशैली, व्यायाम, योग्य आहार हे या पीसीओएसवरील उपाय आहे आणि ते रोज करणे गरजेचे आहेत. पण यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेही तेवढेच गरजेचे आहे.
