AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगपासून ते बिटकॉईन घोटाळ्यापर्यंत राज कुंद्रा यांचे नाव अनेकदा वादात अडकले आहे. चला तर मग जाणून घेऊया राज कुंद्राच्या मोठ्या वादांबद्दल…

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!
राज कुंद्रा
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 1:50 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. अश्लील चित्रपट बनवून ते अ‍ॅप्सवर प्रदर्शित केल्याबद्दल राज कुंद्रा यांना सोमवारी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्रा यांचे नाव एखाद्या वादविवादात अडकलेय, असे पहिल्यांदाच घडत नाहीय. राज कुंद्रा आणि वादांचा तसा दीर्घ संबंध आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगपासून ते बिटकॉईन घोटाळ्यापर्यंत राज कुंद्रा यांचे नाव अनेकदा वादात अडकले आहे. चला तर मग जाणून घेऊया राज कुंद्राच्या मोठ्या वादांबद्दल…

बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने राज कुंद्रावर बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला होता. तथापि, या प्रकरणात कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही. पूनम पांडेने राज कुंद्रावर बलात्कारची, तिला जिवे मारण्याची आणि अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. पूनम पांडे म्हणाली होती की, राज कुंद्राच्या कंपनीबरोबरचा तिचा करार संपला आहे, असे असूनही तिच्या कंपनीतील लोकांनी तिचा नंबर व तिचे व्हिडीओ परवानगीशिवाय वापरले. तथापि, या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे, याची आम्ही पुष्टी देत ​​नाही. पण या प्रकरणानंतर बॉलिवूड कॉरिडोरमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

आयपीएल मॅच फिक्सिंग

राज कुंद्रा यांचे नाव 2015 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये सट्टेबाजीच्या प्रकरणात देखील आले होते. राज कुंद्रा राजस्थान रॉयल्स संघाचा सह-मालक होता. या प्रकरणात त्याचा साथीदार आणि तो दोषी आढळला, त्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. शिल्पा शेट्टी हिचेही नाव या प्रकरणात समोर आले होते.

बिटकॉईन घोटाळा

वर्ष 2018 मध्ये, राज कुंद्रा यांचे नाव बिटकॉईन घोटाळ्यात देखील आले होते. या प्रकरणात, राज कुंद्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीही केली होती. पुण्यातील दोन व्यावसायिक अमित भारद्वाज आणि गेनबिटकॉइन कंपनीचे संचालक असलेले त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यांच्यावर क्रिप्टो करन्सी योजनेच्या माध्यमातून 8,000हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप होता. तथापि, राज कुंद्रा या प्रकरणात पीडित होते की, आरोपी, हे त्यावेळी स्पष्ट झाले नाही.

पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाचा वाद

राज कुंद्राने 2005 मध्ये कविताशी लग्न केले होते, परंतु हे नाते तीन वर्षेही टिकले नाहीत. 2007मध्ये राज कुंद्राने कविताशी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच 2009 मध्ये त्यांनी शिल्पा शेट्टीशी लग्न केले. कविताशी ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या एका मुलाखतीत राज कुंद्राने आपली माजी पत्नी कवितावर गंभीर आरोप केले. या वृत्तानुसार, त्याने दावा केला होता की, कविताचे त्याच्या बहिणीच्या पतीशी प्रेमसंबंध होते. या विषयावरही बरेच वादंग झाले.

(From the Bitcoin scandal to IPL match fixing controversy around Raj Kundra)

हेही वाचा :

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राला अटक, दोषी आढळल्यास ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा होणार! जाणून घ्या कायद्याबद्दल…

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.