Ganesh Chaturthi 2021 : अजय देवगणपासून ते वरुण धवनपर्यंत, बॉलिवूडकरही रंगले गणपती बाप्पाच्या आगमनात!

गणेश भक्तांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज (10 सप्टेंबर) प्रत्येक घरात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. अशा स्थितीत बॉलिवूड सेलेब्सचाही या यादीत समावेश आहे की, त्यांचाही गणपतीवर अतूट विश्वास आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सेलेब्स गणेश चतुर्थीचा पवित्र सण साजरा करत आहेत.

Ganesh Chaturthi 2021 : अजय देवगणपासून ते वरुण धवनपर्यंत, बॉलिवूडकरही रंगले गणपती बाप्पाच्या आगमनात!
Bollywood Celeb Ganpati

मुंबई : गणेश भक्तांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज (10 सप्टेंबर) प्रत्येक घरात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. अशा स्थितीत बॉलिवूड सेलेब्सचाही या यादीत समावेश आहे की, त्यांचाही गणपतीवर अतूट विश्वास आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सेलेब्स गणेश चतुर्थीचा पवित्र सण साजरा करत आहेत. बॉलिवूड स्टार्स आज सोशल मीडियावर या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

यावर्षीही कोरोना प्रोटोकॉलमुळे गणपती बाप्पाचा उत्सव फार धूमधडाक्याने होणार नाही. पण बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनपासून अजय देवगणपर्यंत अनेक सेलेब्सनी सोशल मीडियावर गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा सेलेब्सनी कशा दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही गणपतीचे जोरदार स्वागत केले आहे. बिग बींनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ते हात जोडून गणपती बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की ‘गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया !!! ‘

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

त्याचबरोबर अजय देवगणने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर करताना ‘लालबागचा राजा’ चे दर्शन घडवले आहे. अभिनेत्याने लिहिले, ‘भगवान गणेश हे सर्व गोष्टींचे आश्रयदाता आहेत – शांती, समृद्धी, प्रगती, आनंद आणि आरोग्य. आज आपल्या आवडत्या देवतेचे स्वागत करूया, प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया… गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

त्याचबरोबर अभिषेक बच्चनने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे आणि या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने लिहिले आहे की ‘भगवान गणेश तुम्हाला प्रत्येक दुःखापासून मुक्ती देवो! आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!’

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

‘विरासत’ फेम अभिनेत्री पूजा बत्राने या उत्सवात तिच्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे, याशिवाय मलायका अरोरा, सोशल मीडियावर चाहत्यांना गुड मॉर्निंग शेअर करत लिहिले आहे – ‘गणपती बाप्पा मोरया.’ अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, ‘आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. #गणपतीबाप्पा मोरया’

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

दरवेळी प्रमाणे या वेळीही सेलेब्सच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. शिल्पा शेट्टी आणि नील नितीन मुकेशसह अनेक सेलेब्स गणपती बाप्पाला त्यांच्या घरी घेऊन येतात. अलीकडेच शिल्पा शेट्टीचे काही फोटोही समोर आले, ज्यात तिचा मुलगा गणपतीची पूजा करताना दिसला. मात्र, कोरोनामुळे महाराष्ट्रातील अनेक नियमांबाबत बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Bhoot Police Twitter Review : कॉमेडीचा तडका असूनही चित्रपट हरवल्यासारखा, पाहा प्रेक्षकांना कसा वाटला ‘भूत पोलीस’?

गप्पांच्या ओघात शाहीर शेखने जाहीर केली अंकिता लोखंडेची ‘ती’ खाजगी गोष्ट, ऐकून चाहतेही झाले उत्सुक!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI