Gangubai Kathiawadi on OTT: आता ओटीटीवर पाहू शकता आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’!

या चित्रपटाच्या निमित्ताने आलियाने (Alia Bhatt) पहिल्यांदाच संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं. थिएटरमध्ये चांगली कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gangubai Kathiawadi on OTT: आता ओटीटीवर पाहू शकता आलियाचा 'गंगुबाई काठियावाडी'!
ओटीटीवर येतोय आलियाचा 'गंगुबाई काठियावाडी'Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 10:14 AM

अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने आलियाने (Alia Bhatt) पहिल्यांदाच संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं. थिएटरमध्ये चांगली कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहू न शकलेले प्रेक्षक ओटीटीवर तो प्रदर्शित होण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. आतापर्यंत कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ चार आठवड्यांनंतर निर्माते OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचे. परंतु ‘गंगूबाई काठियावाडी’च्या निर्मात्यांनी असा निर्णय घेतला की ते आठ आठवडे थिएटरमध्ये पूर्ण झाल्यानंतरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित करतील. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक प्रतीक्षा करावी लागली. (Gangubai Kathiawadi on OTT)

25 मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला होता. आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज म्हणजेच 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आलियाचा हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगु भाषेतही प्रदर्शित झाला आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ची भूमिका स्वीकारून अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या करिअरमधील सर्वांत मोठा धोका पत्करला होता. मात्र चित्रपटाला मिळालेलं यश पाहता आलियाच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे. हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?

हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईत पळून आल्या होत्या. मात्र लग्नानंतर त्यांच्या पतीने फक्त ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं होतं. कामाठीपुरा परिसरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात करीम लाला यांच्याशी गंगुबाईंची गाठ पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुरा गंगुबाईंच्या हातात दिल्याचं म्हटलं जातं. गंगुबाईंनी कधीही कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरोधात वेश्या व्यवसाय करू दिला नव्हता, असंही सांगितलं जातं.

हेही वाचा:

Chiranjeevi: “त्यावेळी दिल्लीत मला अपमानित झाल्यासारखं वाटलं”; चिरंजीवी यांनी सांगितली 33 वर्षांपूर्वी घडलेली घटना

Sher Shivraj Collection: ‘शेर शिवराज’चे शोज हाऊसफुल! पहिल्या दिवशी दणक्यात कमाई

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.