Chiranjeevi: “त्यावेळी दिल्लीत मला अपमानित झाल्यासारखं वाटलं”; चिरंजीवी यांनी सांगितली 33 वर्षांपूर्वी घडलेली घटना

चिरंजीवी सध्या त्यांच्या 'आचार्य' (Acharya) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ते मुलगा रामचरणसोबत (Ramcharan) स्क्रीन शेअर करणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी 33 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला.

Chiranjeevi: त्यावेळी दिल्लीत मला अपमानित झाल्यासारखं वाटलं; चिरंजीवी यांनी सांगितली 33 वर्षांपूर्वी घडलेली घटना
ChiranjeeviImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 9:30 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. त्यांचं बॉलिवूडशी दीर्घकाळापासून नातं आहे. चिरंजीवी सध्या त्यांच्या ‘आचार्य’ (Acharya) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ते मुलगा रामचरणसोबत (Ramcharan) स्क्रीन शेअर करणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी 33 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. 1989 मध्ये दिल्लीत ही घटना घडली होती, जिथे चिरंजीवी यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. त्यांच्या ‘रुद्रविणी’ या चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी सरकारने चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तिथे भिंतीवर भारतीय चित्रपटाचा इतिहास दर्शविणारे अनेक पोस्टर लावण्यात आले होते. एका भिंतीवर पृथ्वीराज कपूर ते अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांविषयी तिथे लिहिण्यात आलं होतं. मात्र पुढे त्यांनी जे पाहिलं, ते अपमानित करण्यासारखं होतं, असं ते म्हणाले.

“मी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल काहीतरी बघायला मिळेल या अपेक्षेने चालत राहिलो. मात्र, जयललिता यांच्यासोबत एमजीआर आणि प्रेम नझीर यांचा फोटो तिथे होता. त्यांनी त्याला दाक्षिणात्य चित्रपट असं शीर्षक दिलं होतं. फक्त तेवढंच. त्यांनी राज कुमार, विष्णुवर्धन, एनटी रामाराव, नागेश्वर राव, शिवाजी गणेशन किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांना ओळखलंच नव्हतं. मला त्या क्षणी खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. ते अपमान केल्यासारखंच होतं. त्यांनी हिंदी चित्रपटांना भारतीय चित्रपट म्हणून दाखवलं. तर इतर चित्रपटांना ‘प्रादेशिक चित्रपट’ म्हणून वर्गीकृत केलं,” असं चिरंजीवी म्हणाले.

याबद्दल ते त्यावेळी बोलले होते, मात्र त्याला फारसा काही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. “परंतु बाहुबली किंवा RRR यांसारख्या चित्रपटांमुळे आता देश दक्षिण भारतातील दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखकांना ओळखत आहे याचा अभिमान वाटत असल्याचं ते म्हणाले. बाहुबली या चित्रपटाचा मला अभिमान वाटतो कारण त्याने प्रादेशिक आणि हिंदी चित्रपटांमधील दरी दूर केली आणि आपण सर्व भारतीय चित्रपट उद्योगाचा एक भाग आहोत हे सिद्ध केलं. या चित्रपटांनी तेलुगू प्रेक्षकांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली. बाहुबली आणि आरआरआरसारखे चित्रपट दिल्याबद्दल एसएस राजामौली यांना सलाम,” असं ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी यशच्या केजीएफ 2 आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटांचंही कौतुक केलं.

हेही वाचा:

Sher Shivraj Collection: ‘शेर शिवराज’चे शोज हाऊसफुल! पहिल्या दिवशी दणक्यात कमाई

KGF 2: ‘रॉकीभाई’ची रॉकिंग कमाई; ‘केजीएफ 2’ने पार केला 300 कोटींचा टप्पा

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.