KGF 2: ‘रॉकीभाई’ची रॉकिंग कमाई; ‘केजीएफ 2’ने पार केला 300 कोटींचा टप्पा

अभिनेता यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या 'केजीएफ: चाप्टर 2' (KGF 2) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.

KGF 2: 'रॉकीभाई'ची रॉकिंग कमाई; 'केजीएफ 2'ने पार केला 300 कोटींचा टप्पा
KGF Chapter 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 3:42 PM

अभिनेता यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF 2) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 321.12 कोटी रुपये इतकी झाली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडन या बॉलिवूड कलाकारांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हिंदी व्हर्जननेच 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. (Box Office Collection)

दुसऱ्या वीकेंडची कमाई-

शुक्रवार- 11.56 कोटी रुपये शनिवार- 18.25 कोटी रुपये रविवार- 22.68 कोटी रुपये

केजीएफ 2 हा सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपटांना फटका बसला आहे. शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र केजीएफ 2 मुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला आहे.

तरण आदर्शचं ट्विट-

बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, केजीएफ 2 ने जगभरात आतापर्यंत 818.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या ‘2.0’ या चित्रपटाला केजीएफ 2ने मागे टाकलं आहे. येत्या काही दिवसांत तो ‘पीके’ या चित्रपटालाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ या चित्रपटाने जगभरात 854 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

हेही वाचा:

Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटातील बाळासाहेबांच्या भूमिकेवरून उचलला पडदा; सोशल मीडियावर ‘गुरुपौर्णिमा’ गाण्याची चर्चा

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध संजनाला देणार घटस्फोट? मालिकेत नवा ट्विस्ट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.