AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध संजनाला देणार घटस्फोट? मालिकेत नवा ट्विस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सर्वकाही मिळवूनसुद्धा सतत असुरक्षिततेच्या भावनेत राहणाऱ्या संजनाने (Rupali Bhosle) केलेली मोठी चूक आता तिलाच महागात पडणार असल्याचं दिसतंय.

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध संजनाला देणार घटस्फोट? मालिकेत नवा ट्विस्ट
Rupali BhosleImage Credit source: Hotstar
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 2:55 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सर्वकाही मिळवूनसुद्धा सतत असुरक्षिततेच्या भावनेत राहणाऱ्या संजनाने (Rupali Bhosle) केलेली मोठी चूक आता तिलाच महागात पडणार असल्याचं दिसतंय. संजनाने फसवणुकीच्या मार्गाने देशमुखांचं घर आपल्या नावावर करून घेतलं आहे. मात्र हे कळल्यानंतर अनिरुद्ध (Milind Gawali) तिच्याच विरोधात जाईल याची कल्पना तिने केली नव्हती. आत हे सर्व इतक्या टोकाला पोहोचलंय की अनिरुद्ध संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करतोय. अरुंधतीविरोधात केलेलं कटकारस्थान संजनावरच उलटताना दिसतंय. “या मूर्खपणात तू मला गमावलंस. अफेअर्समधली माणसं वेगळी असतात आणि नवरा-बायको झाल्यावर ती वेगळी असतात. माझ्या प्रेमाखातर तू स्वत:ला बदलशील असं मला वाटलं. पण मला वाटलं त्याहूनही तू स्वार्थी निघालीस. मी लवकराच लवकर घटस्फोटाचे पेपर्स तयार करून घेतोय,” अशा शब्दांत अनिरुद्ध तिला सुनावतो.

संजनासमोर सध्या सर्वच बाजूंनी समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे अनिरुद्ध घटस्फोटाची तयारी करतोय तर दुसरीकडे शेखरने तिला तिच्या मुलापासून दूर केलंय. “मी वाट्टेल ते करीन पण तुला तुरुंगात जायला लावेन,” असं म्हणत तो निखिलला भेटू देणार नसल्याचं तिला सांगतो.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

फसवणुकीने घर आपल्या नावे केल्यानंतर संजनाचा अहंकार आणखीनच वाढला. या अहंकारामुळेच तिने अरुंधतीला बरंच काही सुनावलं. “अनिरुद्ध कितीही काहीही म्हणाला तरी तो गेली कित्येक वर्षे मला सोडू शकला नाही आणि म्हणूनच मी इथे हक्काने उभी आहे. तू इथली कोणीच नाहीस आणि मी मालकीण आहे”, असं ती अरुंधतीला म्हणते. पण आता अनिरुद्धच आपल्यासोबत नसणार या भीतीने ती पुन्हा घर देशमुखांच्या नावे करणार की केलेल्या चुकीनंतर तुरुंगात शिक्षा भोगणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.

हेही वाचा:

Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटातील बाळासाहेबांच्या भूमिकेवरून उचलला पडदा; सोशल मीडियावर ‘गुरुपौर्णिमा’ गाण्याची चर्चा

Tu Tevha Tashi: संदीप खरेंची मुलगी रुमानी म्हणतेय, “मनोरंजनक्षेत्राशी संबंधित पालक असतील तर..”

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.