AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेनेलिया हिला रितेश देशमुख याने केली चित्रपटांमध्ये काम करण्यास मनाई?, अभिनेत्रीने केला हा मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात जेनेलिया ही मुख्य भूमिकेत होती. रितेश देशमुख आणि जेनेलिया चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले.

जेनेलिया हिला रितेश देशमुख याने केली चित्रपटांमध्ये काम करण्यास मनाई?, अभिनेत्रीने केला हा मोठा खुलासा
| Updated on: Apr 21, 2023 | 6:37 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे कायमच चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून जेनेलिया देशमुख ही दूर आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे यांच्या या चित्रपटाला (Movie) प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद देखील मिळाला. मात्र, रितेश देशमुख याच्यासोबत लग्न केल्यानंतर जेनेलिया देशमुख ही फार काही चित्रपटांमध्ये काम करताना दिसली नाही. यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक चर्चा या रंगताना दिसल्या.

जेनेलिया देशमुख ही चित्रपटांमध्ये जरी काम करत नसली तरीही ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. जेनेलिया देशमुख ही सोशल मीडियावर कायमच रिल्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जेनेलिया देशमुख हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते.

नुकताच जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे करीना कपूर खान हिच्या चॅट शो What Women Want मध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये जेनेलिया देशमुख हिने मोठा खुलासा केला आहे. जेनेलिया देशमुख म्हणाली की, मी चित्रपटांमध्ये काम करत नसल्याने अनेकांनी मला विचारले की, रितेश देशमुख याने तुला चित्रपटांमध्ये काम करण्यास मनाई केलीये का?

पण मला हे नक्कीच सांगावे वाटते की, मला वाटले मी आता थोडा ब्रेक घ्यायला हवा म्हणून मी ब्रेक घेतला. मला रितेश देशमुख किंवा फॅमिलीपैकी कोणीच याबद्दल बोलत नाही. उलट हे सर्वजण मला सपोर्ट करतात. सर्वांना वाटते की, रितेश देशमुख यानेच मला चित्रपटांमध्ये काम करण्यास मनाई केलीये. मात्र, असे अजिबातच नाहीये.

रितेश देशमुख म्हणाला की, जेनेलिया हिला जे काही करायचे आहे, तो तिचा निर्णय आहे. मी तिला काय करायचं हे कधीच सांगणार नाही. ती माझ्या निर्णयांचा कायमच आदर करते. ती आता तीन चार चित्रपट करत आहे. मी तिला म्हणालो तू काम कर. मी मराठी चित्रपट बनवत आहे, त्यामध्ये तुला काम करायचे आहे. या चॅट शोमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी काही मोठे खुलासे हे केले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?