जर माझे लग्न झाले नसते तर…म्हणत गोविंदाने माधुरी दीक्षित हिच्याबद्दल केले होते हे मोठे वक्तव्य

गोविंदाने आतापर्यंतच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जर माझे लग्न झाले नसते तर...म्हणत गोविंदाने माधुरी दीक्षित हिच्याबद्दल केले होते हे मोठे वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 4:53 PM

मुंबई : गोविंदाने आपल्या अभिनयाच्या काैशल्याने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवले आहे. गोविंदा कायमच चर्चेत असतो. गोविंदाने आतापर्यंतच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 90 च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा ठरला आहे. विशेष बाब म्हणजे आजही गोविंदाची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. नुकताच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात गोविंदाच्या पाया पडून एका पाकिस्तानी अभिनेत्याने सांगितले की, मी गोविंदा सरांकडे पाहून अभिनय करायला शिकलोय.

गोविंदाचे फॅन फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात बघायला मिळतात. अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, अनेक शोमध्ये गोविंदा हजेरी लावतो.

एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये नुकताच गोविंदा आणि त्याची पत्नी पोहचले होते. याच कार्यक्रमात गोविंदाच्या मुलाने त्याच्यासोबत एका हीट गाण्यावर जबरदस्त डान्स केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.

काही वर्षांपूर्वी गोविंदाने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने काही अभिनेत्रींबद्दल बोलत असताना माधुरी दीक्षित हिच्याबद्दल असे काही बोलले होते की, यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता.

गोविंदा म्हणाला की, माधुरी दीक्षित मला खूप जास्त आवडते. खरोखर सांगतो की, जर माझे लग्न झाले नसते तर मी नक्कीच तिकडे बघितले असते. इतकी सुंदर अभिनेत्री सध्या बघायला तरी कुठे मिळते?

माधुरी दीक्षित आणि गोविंदा यांनी दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. रवीना टंडन, करिश्मा, जूही चावला या देखील माझ्या आवडत्या अभिनेत्री असल्याचे गोविंदाने म्हटले होते.

याच मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले होते की, पहिल्या पगारीमध्ये त्याने त्याच्या आईसाठी एक साडी आणि चैन खरेदी केली होती. गोविंदाचा मुलगा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.