AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

An Action Hero | ‘आयुष्मान खुराना’च्या अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो चित्रपटाची पहिल्याच दिवशी हवा गुल

मागचे दोन चित्रपट आयुष्मानचे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. आता हा चित्रपट काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

An Action Hero | 'आयुष्मान खुराना'च्या अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो चित्रपटाची पहिल्याच दिवशी हवा गुल
| Updated on: Dec 02, 2022 | 4:17 PM
Share

मुंबई : आयुष्मान खुराना याचा अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाची रिलीजच्या अगोदर प्रचंड अशी चर्चा होती. या चित्रपटात मलायका अरोराचे आयटम साँग आहे, ज्यावरून मोठा वाद सध्या सुरू आहे. पाकिस्तानमधून या आयटम साँगवर टीका केली जातंय. पाकिस्तानी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त करत आहेत. मागचे दोन चित्रपट आयुष्मानचे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. आता हा चित्रपट काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

आयुष्मान खुरानाच्या अ‍ॅन  अ‍ॅक्शन हिरो चित्रपटासमोर अजय देवगणच्या दृश्यम 2 या चित्रपटाचे मोठे आव्हान नक्कीच आहे. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय. वरूणच्या भेडिया हा चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.

एका रिपोर्टनुसार आयुष्मानच्या अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरोमुळे दृश्यम 2 ला काही खास फटका बसणार नाहीये. आयुष्मानचा हा चित्रपट खूप झाले तर एक कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करू शकेल.

sacnilk च्या रिपोर्टनुसार आयुष्मानचा अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर 1 कोटींच्या आतमध्येच कमाई करू शकणार आहे. असे सांगितले जात आहे की, अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरोचे सकाळचे कलेक्शन फक्त 5 टक्केच होते.

2022 मध्ये आयुष्मानचा रिलीज झालेला चित्रपट डाॅक्टर जी याच्यापेक्षा हा चित्रपट कमी कमाई बाॅक्स आॅफिसवर करेल. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर आयुष्मानचे चित्रपट काही खास कामगिरी करू शकत नाहीयेत.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला होता की, माझे चित्रपट जास्त चालले नाहीत तरीपण काही परिणाम पडत नाही. कारण मुळात माझे चित्रपट फार कमी बजेटचे असतात.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.