Happy Birthday Himesh Reshammiya | लॉकडाऊन दरम्यान रचला नवा विक्रम, जाणून चाहतेही होतील अवाक्!

हिमेशने सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये आपली खास स्टाईल निर्माण केली होती. गाण्याच्या स्टाईलपासून ते कॅप परिधान केलेल्या लूकपर्यंत तो चाहत्यांना नेहमीच पसंत पडला. आज, आम्ही तुम्हाला हिमेशशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत...

Happy Birthday Himesh Reshammiya | लॉकडाऊन दरम्यान रचला नवा विक्रम, जाणून चाहतेही होतील अवाक्!
हिमेश रेशमिया

मुंबई : आज (23 जुलै) बॉलिवूड गायक, संगीतकार आणि अभिनेता हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याचा वाढदिवस आहे. आज 23 जुलै रोजी हिमेश रेशमिया आपला वाढदिवस साजरा करत आहेत. गुजरातमध्ये जन्मलेला हिमेश हा असा गायक आहे, ज्याला त्याच्या पहिल्या गाण्यासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट डेब्यू सिंगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हिमेशने सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये आपली खास स्टाईल निर्माण केली होती. गाण्याच्या स्टाईलपासून ते कॅप परिधान केलेल्या लूकपर्यंत तो चाहत्यांना नेहमीच पसंत पडला. आज, आम्ही तुम्हाला हिमेशशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत…

पहिल्याच अल्बमने केला धमाका

हिमेशचा पहिला अल्बम ‘आप का सूरूर’ हा होता. त्यावेळी तो खूप गाजला होता. भारतीय संगीत उद्योगाच्या इतिहासात अजूनही सर्वाधिक विक्री होणारा अल्बम म्हणून या अल्बमचे नाव घेतले जाते.

अभिनयाचाही केला प्रयत्न

गाण्यात अफाट यश मिळवल्यानंतर हिमेशने अभिनयातही नशीब आजमावले. पण विशेष म्हणजे हिमेशला अभिनयात चाहत्यांकडून जास्त प्रेम मिळालं नाही. हिमेशने काही हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकासुद्धा केली होती.

हिमेश रेशमिया उत्तम संगीत देण्यासाठी देखील ओळखला जातो. ‘तेरे नाम’ या चित्रपटाला संगीत देऊन हिमेशने अपार यश मिळवले होते. त्याने सलमान खानच्या अनेक चित्रपटात संगीत दिले आहे. हिमेशला त्याच्या पहिल्या गाण्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू सिंगर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

लॉकडाऊनमध्ये केला नाव कारनामा

नुकतेच हिमेश रेशमियाने स्वत: जाहीर केले की, त्याने लॉकडाऊनमध्ये घरी राहून 300 नवीन गाणी तयार केली. एका मुलाखतीत हिमेश म्हणाला होत की, त्याने एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये 700 गाणी तयार केली आहेत, त्यापैकी लॉकडाऊनमध्येच 300 नवीन गाणी तयार केली गेली आहेत.

हिमेशची कारकीर्द

हिमेश रेशमियाने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटात संगीत देऊन बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’ अशी सुपरहिट गाणी हिमेशची नावावर आहेत.

हिमेश रेशमियाचे लग्न

हिमेश रेशमियाचे लग्न खूपच फिल्मी आहे. वर्ष 2018 मध्ये त्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यावेळी हिमेशच्या लग्नाच्या बातमी खूप चर्चेत होती. हिमेशने आपली दीर्घकालीन मैत्रीण सोनिया कपूरसोबत गुजराती प्रथेनुसार लग्न केले. असं म्हणतात की 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हिमेशने सात फेरे घेतले.

(Happy Birthday Himesh Reshammiya singer recorded 300 songs during lockdown)

हेही वाचा :

Raj Kundra Arrest : राज कुंद्रा यांनी दीड वर्षात 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवले? गुन्हे शाखेला मोठा साठा उपलब्ध

Raj Kundra Top 10 Memes : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर मीम्सची बरसात, तुम्हालाही येईल हसू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI