Happy Birthday Rimi Sen | अभिनय विश्वापासून दूर जात राजकारणात उतरली होती रिमी सेन, पाहा कसा होता अभिनेत्री चित्रपट प्रवास

‘हंगामा’, ‘बागबान’ आणि ‘धूम’ सारखे हिट चित्रपट देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन (Rimi Sen) हिचा आज (21 सप्टेंबर) वाढदिवस आहे. अभिनेत्री रिमी सेन हिचा जन्म 21 सप्टेंबर 1981 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला.

Happy Birthday Rimi Sen | अभिनय विश्वापासून दूर जात राजकारणात उतरली होती रिमी सेन, पाहा कसा होता अभिनेत्री चित्रपट प्रवास
Rimi Sen

मुंबई : ‘हंगामा’, ‘बागबान’ आणि ‘धूम’ सारखे हिट चित्रपट देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन (Rimi Sen) हिचा आज (21 सप्टेंबर) वाढदिवस आहे. अभिनेत्री रिमी सेन हिचा जन्म 21 सप्टेंबर 1981 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. रिमी सेनने आपले प्रारंभिक शिक्षण कोलकाताच्या विद्या भारती गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केले आहे. तिने कलकत्ता विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केली. रिमीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या फिल्मी करिअरबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सध्या ती काय करत आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत.

रिमीने ‘हंगामा’, ‘धूम’, ‘गोलमाल’, ‘दिवाने हुआ पागल’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रत्येक चित्रपटात तिच्या मागे नायकांची एक रांग होती. जवळजवळ प्रत्येक चित्रपटात, त्यातील नायक तिच्याशी लग्न करण्यासाठी एकमेकांशी लढताना दिसले. एकेकाळी आपल्या चित्रपटांमुळे हिट ठरलेली रिमी आज विस्मृतीत आयुष्य जगत आहे. 39 वर्षीय रिमीचे अद्याप लग्न झालेले नाही. आता तिच्या अफेअरची कोणतीही बातमी चर्चेत नाही. रिमीने स्वतःला अभिनय विश्वापासून दूर केले आहे.

‘हंगामा’मधून कारकिर्दीची सुरुवात

रिमी सेनने लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रिमीने जाहिरात आणि मॉडेलिंगच्या जगात खूप नाव कमावले होते. परेश रावल, अक्षय खन्ना अभिनित ‘हंगामा’ या कॉमेडी चित्रपटाद्वारे तिची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. हा विनोदी चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासाठी रिमीला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री म्हणून नामांकन देखील मिळाले होते.

मनोरंजन विश्वात येण्यासाठी तिला फारसा संघर्ष करावा लागला नाही. ‘हंगामा’ या हिट चित्रपटात काम करण्याची ऑफर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्वतः तिला दिली होती. रिमी सेनचे नशीब होते की, ती कोकच्या ऑडिशनला गेली आणि प्रियदर्शन त्यावेळी हंगामा चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत होते. त्यांनी तिच्या समोर प्रस्ताव ठेवला, आणि एकही क्षण न घालवता रिमीने तो स्वीकारला. हा चित्रपट हिट ठरला आणि त्याने रिमीलाही ओळख मिळवून दिली.

‘हंगामा’ चित्रपटामुळे रिमीची मनोरंजन विश्वातील कारकीर्द सुरू झाली. यानंतर, तिच्या समोर चित्रपटांची एक रांगच लागत गेली. तिने हिंदी चित्रपटांबरोबर बंगाली आणि तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. ‘धूम’, ‘गरम मसाला’ नंतर रीमीला अभिनेता सलमान खानचा ‘क्यूंकी’ हा चित्रपट मिळाला. यानंतर, ती ‘दिवाने हुई पागल’, ‘फिर हेरा फेरी’, ‘गोलमाल’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकली.

राजकारणात प्रवेश

ती शेवट छोट्या पडद्यावरील चर्चित शो ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. रिमी बिग बॉसमध्ये तिच्या स्वभावामुळे चर्चेत राहिली. या शोनंतरही रिमीची कारकीर्द काही विशेष प्रगती करू शकली नाही आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये अज्ञात झाली. रिमीने 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. रिमी राजकारणात फारशी सक्रिय नसली तरी, रिमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटांमध्ये काम करून ती खूप कंटाळली होती. म्हणूनच तिला दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये जायचे आहे.

हेही वाचा :

Defamation Case : कंगना रनौतने शिवसेनेवर साधला निशाणा, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला!

Rashmi Rocket | चेहऱ्यावर धूळ तर डोळ्यात विजयाची स्वप्न, तापसी पन्नूच्या आगामी ‘रश्मि रॉकेट’चं नवं पोस्टर पाहिलंत का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI