Happy Birthday Shakti Kapoor | खलनायक बनून चर्चेत आले शक्ती कपूर, तुम्हाला माहितेय का अभिनेत्याचं खरं नाव?

600 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय करणारा अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor) हा हिंदी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला खलनायक आहे. शक्ती कपूरने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये 80हून अधिक चित्रपटांमध्ये छेडछाड आणि रेप सीन केले आहेत.

Happy Birthday Shakti Kapoor | खलनायक बनून चर्चेत आले शक्ती कपूर, तुम्हाला माहितेय का अभिनेत्याचं खरं नाव?
शक्ती कपूर
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 7:43 AM

मुंबई : 600 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय करणारा अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor) हा हिंदी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला खलनायक आहे. शक्ती कपूरने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये 80हून अधिक चित्रपटांमध्ये छेडछाड आणि रेप सीन केले आहेत. मात्र, हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या शक्ती कपूरने आता असे सीन्स करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.

शक्ती कपूर यांचा जन्म 3 सप्टेंबर 1952 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. शक्ती कपूरचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर आहे. शक्तीला त्याचे नाव अजिबात आवडले नाही, यामुळे त्याने सुनील नाव बदलून शक्ती केले. शक्ती पंजाबी कुटुंबातील आहे, त्याने दिल्ली विद्यापीठाच्या करोरीमल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

तो सीन पाहून आई-वडीलही नाराज

शक्तीला ‘कुर्बानी’ चित्रपटातून ओळख मिळाली. आपल्या फिल्मी कारकिर्दीत अभिनेता बलात्काराच्या दृश्यांमुळे तो अधिक चर्चेत आला. असे म्हटले जाते की, एकदा शक्ती कपूर आपल्या आई-वडिलांना ‘इन्सानियत के दुश्मन’ चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेले. चित्रपटातील त्याचा रेप सीन पाहून त्याची आई खूप रागावली. ती अगदी सिनेमागृहातून तत्काळ बाहेर आली. यानंतर शक्तीच्या वडिलांनी त्याला खूप फटकारले.

सेन्सॉर बोर्डही चक्रावले

1982मध्ये दयानंद दिग्दर्शित ‘गुमसूम’ चित्रपटातील शक्ती कपूरचा बलात्कार रेप सीन चर्चेत आला होता. शक्तीने ‘मेरे आगोश में’ या चित्रपटातील सर्वात वादग्रस्त दृश्य दिले होते. हा सीन इतका वादग्रस्त होता की, सेन्सॉर बोर्डाने कित्येक महिने या चित्रपटाला मंजुरी दिली नव्हती.

आणि शक्ती कपूर बॅनही झाला!

2005 मध्ये एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये शक्ती कपूर एका टीव्ही शोमधील भूमिकेच्या बदल्यात एका मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करताना कॅमेऱ्यात पकडला गेला. एवढेच नाही, तर शक्ती कपूर त्या मुलीला सांगताना आढळला की, इंडस्ट्रीमध्ये हे नेहमीच घडत आले आहे. आज ज्या सगळ्या मोठ्या अभिनेत्रींनी एव्हढी उंची गाठली आहे, त्या एवढ्या फेवर देऊनच तिथे पोहोचल्या आहेत.

2005मध्ये शक्तीचे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर फिल्म आणि टेलिव्हिजन गिल्ड ऑफ इंडियाने त्याच्यावर बंदी घातली होती. मात्र, ही बंदीही एका आठवड्यानंतर मागे घेण्यात आली. शक्ती कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची मुलगी श्रद्धा कपूर त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याच्यावर रागावली होती. मुलीची नाराजी दूर करण्यासाठी त्याने दारू पिणे बंद केले होते.

पद्मिनी कोल्हापुरेच्या बहिणीशी थाटला संसार

शक्ती कपूर ‘बिग बॉस 5’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. ‘बिग बॉस सीझन 5’मध्ये 13 स्पर्धकांमध्ये शक्ती हा एकमेव पुरुष स्पर्धक होता. शक्ती कपूरने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची बहिण शिवांगी हिच्यासोबत प्रेमविवाह केला. शक्तीच्या ‘किस्मत’ या चित्रपटाच्या सेटवर त्याची शिवांगीशी भेट झाली. पहिल्याच भेटीत तो शिवांगीच्या प्रेमात पडला होता.

हेही वाचा :

पायल रोहतगीच्या वकिलाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर नाकारला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

‘तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवता, सलाम!’, सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट फ्रंटलाईन योद्ध्यांसाठी!

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.