Happy Birthday Sonu Nigam | कधी काळी लग्नसोहळ्यांमध्ये गाणी गायचा, ‘या’ शोमुळे सोनू निगमला मिळाली ओळख!

| Updated on: Jul 30, 2021 | 1:00 PM

गायक सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर पसरली आहे. लोक सोनूच्या गाण्यांचे दिवाने आहेत. चाहत्यांसमोर सर्व प्रकारची गाणी सादर करणाऱ्या सोनू निगम (sonu Nigam) याचा आज वाढदिवस आहे.

Happy Birthday Sonu Nigam | कधी काळी लग्नसोहळ्यांमध्ये गाणी गायचा, ‘या’ शोमुळे सोनू निगमला मिळाली ओळख!
सोनू निगम
Follow us on

मुंबई : गायक सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर पसरली आहे. लोक सोनूच्या गाण्यांचे दिवाने आहेत. चाहत्यांसमोर सर्व प्रकारची गाणी सादर करणाऱ्या सोनू निगम (sonu Nigam) याचा आज वाढदिवस आहे. गायक सोनू निगम याचा जन्म 30 जुलै 1973 रोजी हरियाणाच्या फरीदाबाद येथे झाला. सोनूला लहानपणापासूनच गाणी गाण्याची आवड होती.

सोनूला त्याच्या वडिलांकडून गाण्याचे कौशल्य प्राप्त झाले. सोनू निगम हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट गायक आहे. आजघडीला सोनूची गणना मोठ्या दिग्गजांमधे केली जाऊ शकते, पण एक काळ असा होता की तो विवाहसोहळ्यांमध्ये गाणी गायचा.

रफींच्या आवाजाने प्रभावित झाला सोनू

सोनू निगमने वयाच्या चौथ्या वर्षापासून गायनास सुरुवात केली होती. सोनूने त्याचे वडील अगम निगम यांच्यासह लहान वयातच स्टेज शो, पार्टीज आणि लग्नांमध्ये गाणे सुरू केले होते. दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजाने सोनू लहानपणापासूनच खूप प्रभावित झाला होता. हेच कारण आहे त्याच्याकडून रफीची गाणी अनेकदा रंगमंचावर गायली जातात.

सोनूचे संगीत शिक्षण

जेव्हा वयाच्या 18 व्या वर्षी सोनूच्या वडिलांना लक्षात आले की, आपला मुलगा चांगले गाणे गाऊ लागला, तेव्हा ते सोनूला मुंबईला घेऊन आले. येथे सोनू निगमने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर सोनू निगमचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्याने उदरनिर्वाहासाठी स्टेज शो करायला सुरुवात केली.

‘या’ शोमधून मिळाली ओळख

‘सारेगामापा’ हा गायन रिअॅलिटी शो होस्ट करताना सोनूला त्याची खरी ओळख मिळाली. हा शो 1995 मध्ये प्रसारित झाला. दरम्यान, सोनू एकदा टी-सीरिजचा मालक गुलशन कुमार यांना भेटला. गुलशन कुमार यांनीच सोनूला ‘बेवफा सनम’ या चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. या चित्रपटात सोनूने ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ हे प्रसिद्ध गाणे गायले. या गाण्यानंतरच तो सर्वांच्या नजरेत आला होता.

राष्ट्रीय पुरस्कारावर कोरले नाव

सोनूने केवळ हिंदी चित्रपटातच नव्हे तर इंग्रजी, कन्नड, बंगाली, उडिया, पंजाबी, तमिळ, मैथिली, भोजपुरी, नेपाळी आणि मराठी भाषांमध्येही आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. सोनू निगमने आपल्या गायनाच्या जोरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आपल्या आवाजाच्या जोरावर सोनूने राष्ट्रीय पुरस्कारावर देखील आपले नाव कोरले आहे.

अभिनयातही आजमावले नशीब

गाण्याव्यतिरिक्त सोनूने अभिनयातही नशीब आजमावले आहे. सोनूने बर्‍याच चित्रपटांत भूमिका देखील केल्या, पण गाण्यातून मिळालेले यश तिथे मिळू शकले नाही. सोनू निगमने ‘लव्ह इन नेपाळ’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण जेव्हा अभिनयात यश आले नाही, तेव्हा त्याने फक्त गाण्यावरच लक्ष केंद्रित केले.

(Happy Birthday Sonu Nigam know some unknown things about Singer)

हेही वाचा :

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ‘आपली यारी’, फ्रेंडशीप-डेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने रिलीज केलं नवं गाणं!

पहिल्याच चित्रपटातील बोल्ड सीनमुळे मंदाकिनी चर्चेत, अंडरवर्ल्ड डॉनसोबतही जुळलेले सूर!