AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sohail Khan-Seema Khan Divorce: लग्न-संसाराच्या बाबतीत खान कुटुंब कमनशिबीच; परिवारात घटस्फोटांचा इतिहास

बॉलिवूडमध्ये अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय असणारं हे कुटुंब लग्नाच्या बाबतीत मात्र कमनशिबी ठरत असल्याचं दिसतंय. एकीकडे अभिनेता सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार, या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणालाच मिळालं नाही. तर आता दुसरीकडे त्याच्या दोनही भावंडांचा संसार मोडला आहे.

Sohail Khan-Seema Khan Divorce: लग्न-संसाराच्या बाबतीत खान कुटुंब कमनशिबीच; परिवारात घटस्फोटांचा इतिहास
Khan familyImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 10:13 AM
Share

अभिनेता- निर्माता सोहैल खान (Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा खान (Seema Khan) यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर आता घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केला आहे. 1998 मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि गेल्या वर्षांतील वादामुळे हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. शुक्रवारी (13 मे) या दोघांना जेव्हा मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाबाहेर पाहिलं गेलं, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. खान कुटुंबातील हा पहिलाच घटस्फोट नाही. याआधी अरबाज खान आणि मलायका अरोरा हेसुद्धा लग्नाच्या तब्बल 19 वर्षांनंतर विभक्त झाले. बॉलिवूडमध्ये अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय असणारं हे कुटुंब लग्नाच्या बाबतीत मात्र कमनशिबी ठरत असल्याचं दिसतंय. एकीकडे अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार, या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणालाच मिळालं नाही. तर आता दुसरीकडे त्याच्या दोनही भावंडांचा संसार मोडला आहे.

सलमान खान

अभिनेते, लेखक आणि निर्माते सलीम खान यांना सलमान खान, अलविरा खान अग्निहोत्री, अर्पिता खान, अरबाज खान आणि सोहैल खान अशी पाच मुलं आहेत. सलमान, अरबाज आणि सोहैल यांच्यामध्ये बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान मोठा आहे तर सोहैल सर्वांत लहान आहे. सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आलं. त्याच्या अनेक रिलेशनशिप्सच्या चर्चाही झाल्या. मात्र तो लग्न कधी करणार, या प्रश्नाचं उत्तर आजवर कोणालाच मिळालेलं नाही. सध्या तो अभिनेत्री आणि मॉडेल लुलिया वंतूरला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. मात्र या दोघांच्याही लग्नाची चिन्हं दूरदूरपर्यंत दिसून येत नाहीत.

अरबाज खान

अरबाज खान आणि मलायका अरोरा ही जोडी अनेकदा चर्चेत आली. 1998 मध्ये या दोघांचं लग्न झालं आणि 2017 मध्ये ते विभक्त झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर 2019 मध्ये मलायकाने अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असल्याचं जगजाहीर केलं. अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेऊ नये यासाठी खान कुटुंबीयांनीही खूप प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर सलमाननेही अनेकदा त्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अरबाज आणि मलायका हे घटस्फोट घेण्यावर ठाम होते. घटस्फोटानंतर मुलगा अरहान हा मलायकासोबत राहतो. मुलासाठी अनेकदा अरबाज आणि मलायका एकत्र आल्याचं पहायला मिळालं.

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

सोहैल खान

सोहैल आणि सीमा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते. हे दोघं गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. नेटफ्लिक्सच्या ‘बॉलिवूड वाइव्स’ या शोमध्ये तिने तसं स्पष्टदेखील केलं होतं. सोहैल आणि माझ्यात काहीच आलबेल नसल्याचंही तिने म्हटलं होतं. “अनेकदा वेळेसोबत तुमचे नातेसंबंध बिघडू लागतात आणि ते वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाही कारण आम्ही आनंदी आहोत आणि माझी मुलं खूश आहेत. सोहैल आणि मी एकत्र खूश नाही पण आम्ही एक कुटुंब म्हणून राहतोय. आमच्यासाठी मुलांचा आनंद महत्त्वाच आहे,” असं ती म्हणाली होती. सोहैल आणि सीमा यांचाही संसार मोडू नये म्हणून सलमानचे प्रयत्न केल्याचं समजतंय. मात्र घटस्फोट घेण्याबाबत हे दोघं ठाम आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.