AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा सलमान खानवर हल्ल्याचा कट, पोलिसांची मोठी कारवाई, धक्कादायक माहिती उघड

लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या नव्या कटानुसार, 70 ते 80 जण सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी करत होते. हे सर्व आरोपी सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आणखी एका आरोपीला हरियाणातून अटक करण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा सलमान खानवर हल्ल्याचा कट, पोलिसांची मोठी कारवाई, धक्कादायक माहिती उघड
लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा सलमान खानवर हल्ल्याचा कट, पोलिसांची मोठी कारवाई
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 02, 2024 | 8:53 PM
Share

अभिनेता सलमान खान याच्या पाठीमागील लॉरेन्स बिश्नोई टोळीचं शुक्लकाष्ठ काही केल्या कमी होताना दिसत नाही. सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गेल्या महिन्यात दोन तरुणांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती. तसेच मुंबई पोलीसही या घटनेनंतर जास्त सतर्क झाले आहेत. सलमान खानच्या घरावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींना गुजरामधून अटक केली होती. एवढं सगळं होऊनही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कुरापत्या काही केल्या संपताना दिसत नाहीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानच्या विरोधात आणखी एक नवा कट रचला होता. पण हा कट उधळून लावण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.

विशेष म्हणजे या कटात तब्बल 70 ते 80 जणांचा समावेश होता. यावेळी सलमान खान याच्यावर हल्ला करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेला कटाचा थेट पाकिस्तानशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. सलमानवर हल्ला करण्यासाठी थेट पाकिस्तानातून AK-47 मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक कट समोर आल्यानंतर पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. या तपासात पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी सलमान खान विरोधातच्या नव्या कटप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. याआधी नवी मुंबई पोलिसांनी पनवेल येथून चार आरोपींना अटक केली होती.

पोलिसांनी नेमकं कुणाला केली अटक?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या नवीन कटप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरियाणा पोलिसांनी ही अटक केली आहे. हरियाणा पोलिसांनी दीपक उर्फ ​​जॉनी वाल्मिकी (वय ३०) नावाच्या आरोपीला भिवानी येथून अटक केली आहे.

आरोपींचा नेमका कट काय?

लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या नव्या कटानुसार, 70 ते 80 जण सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी करत होते. हे सर्व आरोपी सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली होती. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटकेतील सर्व चारही आरोपी हे थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात होते. तसेच या आरोपींनी सलमानवर हल्ला करण्यासाठी थेट पाकिस्तानातून AK-47 मागवली होती. धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना, झिशान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती. आरोपींचा सलमान खानवर हल्ला करुन कन्याकुमारी मार्गाने श्रीलंकेत पळून जाण्याचा प्लॅन होता, अशी देखील माहिती समोर येत आहे. हे चारही आरोपी पनवेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होती. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?