AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखच्या उजव्या बाजूला असलेल्या मुलाला ओळखलंत का? आज आहे बॉलिवूडचा स्टार

सोशल मीडियावर 21 वर्षे जुना फोटो व्हायरल

शाहरुखच्या उजव्या बाजूला असलेल्या मुलाला ओळखलंत का? आज आहे बॉलिवूडचा स्टार
शाहरुखच्या उजव्या बाजूला असलेल्या मुलाला ओळखलंत का? Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2022 | 7:46 PM
Share

मुंबई- आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर काही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. अशाच एका कलाकाराचा जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जवळपास 21 वर्षे जुना हा फोटो आहे. शाहरुख खानच्या अशोका या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर हा फोटो काढला गेला. अभिनेता विकी कौशलचे (Vicky Kaushal) वडील श्याम कौशल यांनी हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) दिसणारी दोन मुलं ही श्याम कौशल यांचीच आहेत. एका बाजूला विकी आणि दुसऱ्या बाजूला सनी आहे.

श्याम कौशल यांची पोस्ट

2001 मध्ये हा फोटो काढण्यात आला. फिल्म सिटीमध्ये अशोका या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा फोटो काढला होता. विष्णू वर्धन हे त्यावेळी सहाय्यक दिग्दर्शक होते आणि विकी त्यावेळी आठवीत शिकत होता. एकेदिवशी विकीसुद्धा चित्रपटसृष्टीत काम करेल, याची कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. फोटमधल्या याच दोघांनी 2022 मध्ये शेरशाह आणि सरदार उधम या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. यालाच देवाचा आशीर्वाद आणि नशीब म्हणतात, अशी पोस्ट श्याम कौशल यांनी लिहिली आहे.

विकी कौशलने त्याच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत: वेगळं स्थान निर्माण केलंय. ‘मसान’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’, ‘सरदार उधम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम अभिनय केला आहे. विकीचा भाऊ सनी कौशलसुद्धा चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. सनीच्या ‘शिद्दत’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.