AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉलिवूड म्हणजे सर्वात मोठे वेश्यालय, पॉर्नोग्राफीमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त; एका बड्या पॉर्न स्टारच्या नवऱ्याची खदखद

किम कर्दाशिया आणि कान्ये वेस्ट यांनी 2014मध्ये विवाह केला होता. त्यांना चार मुलं आहेत. त्यांना नॉर्थ वेस्ट आणि शिकागो वेस्ट या दोन मुली आणि मुले सालम वेस्ट आणि सेंट वेस्ट ही दोन मुले आहेत. मार्च 2022मध्ये किमने कान्येपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती.

हॉलिवूड म्हणजे सर्वात मोठे वेश्यालय, पॉर्नोग्राफीमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त; एका बड्या पॉर्न स्टारच्या नवऱ्याची खदखद
हॉलिवूड म्हणजे सर्वात मोठे वेश्यालय, पॉर्नोग्राफीमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त; एका बड्या पॉर्न स्टारच्या नवऱ्याची खदखदImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2022 | 10:08 AM
Share

वॉशिंग्टन: हॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉर्न स्टार किम कर्दाशियां (Kim Kardashian) हिचा आधीचा नवरा आणि रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) याने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. कान्ये याने हॉलिवूडचं भीषण वास्तव मांडून आपल्या मनातील सल बोलून दाखवत खळबळ उडवून दिली आहे. त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो हॉलिवूड म्हणजे सर्वात मोठे वेश्यालय असल्याचं म्हणतो. एवढंच नव्हे तर पॉर्नोग्राफीमुळे (pornography) माझं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा आकांतही कान्ये याने व्यक्त केला आहे.

कान्ये नेमकं काय म्हणाला?

पेज सिक्सनुसार, कान्ये वेस्ट याने Victoria Villarroelची एक व्हिडीओ पोस्ट केली होती. नंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. या व्हिडिओतील कॅप्शनमध्ये त्याने किम कर्दाशियां आणि तिची छोटी बहीण कायली जेनर यांच्या विषयी लिहिलं आहे. पॉर्नोग्राफीने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केल्याचंही त्याने त्यात लिहिलं आहे. तसेच आपल्यालाही पॉर्नोग्राफीचं व्यसन जडलं असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

माझ्या मुलींबाबत होऊ देणार नाही

त्याने त्याची आधीची सासू आणि किमच्या आईविषयीही लिहिलं आहे. क्रिस जर तुमच्याकडून प्लेबॉयचं फोटोशूट करून घेत असेल तर करू नका. किम आणि कायलीने त्याच्याकडून फोटोशूट करून घेतलं होतं. हॉलिवूड सर्वात मोठं वेश्यालय आहे. पॉर्नोग्राफीमुळे माझ्या कुटुंबाची वाट लागली. मी या अॅडिक्शनमुळे त्रस्त आहे. इन्स्टाग्राम त्याला प्रमोट करत असतो. माझी मुलगी नॉर्थ आणि शिकागोच्या बाबत असं मी होऊ देणार नाही, असंही त्याने म्हटलं आहे.

तू थांबशील का प्लीज

दरम्यान, कान्ये आणि किमचे काही मेसेजही व्हायरल झाले आहेत. त्यावरून दोघेही चांगलेच ट्रोल झाले होते. एका मेसेजमध्ये कान्ये किमशी बोलत असल्याचं जाणवतं. मात्र, त्याने आता ही पोस्ट डिलीट केली आहे. तुम्ही थांबशील का प्लीज, असं समोरचा व्यक्ती बोलताना दिसत आहे. त्याला कान्येने उत्तर दिलं होतं. समोरासमोर बोलण्याची काहीच गरज नाही. तुला हे निवडण्याचा अधिकार नाही. मुलं शिकण्यासाठी कुठे जातील? तुला बोलण्याचा अधिकार का आहे? कारण तू अर्धी श्वेत वर्णीय आहेस, असं कान्ये या मेसेजमध्ये बोलताना दिसत आहे.

8 वर्षात घटस्फोट

किम कर्दाशिया आणि कान्ये वेस्ट यांनी 2014मध्ये विवाह केला होता. त्यांना चार मुलं आहेत. त्यांना नॉर्थ वेस्ट आणि शिकागो वेस्ट या दोन मुली आणि मुले सालम वेस्ट आणि सेंट वेस्ट ही दोन मुले आहेत. मार्च 2022मध्ये किमने कान्येपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.