International Widow Day | ‘या’ बॉलिवूड चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर दाखवली विधवांची व्यथा, अभिनेत्रींनीही केला सशक्त अभिनय!

प्रत्येक स्त्रीला लग्न आणि विवाहित जीवनाची हजारो स्वप्ने असतात. पण, जेव्हा जीवनसाथी आयुष्याच्या मध्यावरच साथ सोडतो, तेव्हा अनेकदा ही स्वप्ने मोडतात. एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू होताच, तिच्या वाट्याला केवळ दु:ख आणि निराशाच येते. आजचा दिवस (23 जून) जगभरात ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ म्हणून ओळखला जातो.

International Widow Day | ‘या’ बॉलिवूड चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर दाखवली विधवांची व्यथा, अभिनेत्रींनीही केला सशक्त अभिनय!
विधवा दिवस
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 12:59 PM

मुंबई : प्रत्येक स्त्रीला लग्न आणि विवाहित जीवनाची हजारो स्वप्ने असतात. पण, जेव्हा जीवनसाथी आयुष्याच्या मध्यावरच साथ सोडतो, तेव्हा अनेकदा ही स्वप्ने मोडतात. एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू होताच, तिच्या वाट्याला केवळ दु:ख आणि निराशाच येते. आजचा दिवस (23 जून) जगभरात ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ म्हणून ओळखला जातो (International Widow Day Bollywood movies based on Widows life).

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे विधवा महिलांचे दुःख आणि विस्कळीत जीवन प्रस्तुत करतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री देखील आहेत, ज्यांनी एका विधवेची व्यक्तिरेखा साकारली, जी खूपच प्रभावित झाली होती. आज, आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

मदर इंडिया

1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री नर्गिसने विधवा महिलेची दमदार भूमिका साकारली होती. पती गेल्यानंतर एकटी महिला आपल्या मुलांची काळजी घेते आणि लोकांच्या घाणेरड्या नजरांपासून स्वत:चे रक्षण करते, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. हा चित्रपट संपूर्ण नर्गिसच्या भोवती फिरत असल्याचे दाखवण्यात आले. या चित्रपटात नर्गिसने एका एकाकी स्त्रीची भूमिका साकारली जी शेवटी आपल्या मुलाची देखील हत्या करते.

प्रेम रोग

राज कूपरचा चित्रपट ‘प्रेम रोग’ हा एक रोमँटिक चित्रपट म्हणता येईल, पण या सिनेमात विधवाच्या भूमिकेत दिसलेल्या पद्मिनी कोल्हापुरीने तिच्या अभिनयाने सर्वांनाच चकित केले. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी मनोरमा विधवा कशी होते, हे चित्रपटात दाखवण्यात आले होते. त्यानंतर तिच्या सासरी मोठा दीर तिच्यावर बलात्कार करतो आणि ती परत आपल्या मायदेशी परतते. यानंतर, जीवनातील सर्व दु:खांसह मनोरमाचा एकट्याने लढा यात दर्शवला गेला आहे.

मृत्यूदंड

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृत्युदंड’मध्ये माधुरी दीक्षितने एक दमदार भूमिका निभावून सर्वांना चकित केले होते. माधुरीने या चित्रपटामध्ये एक स्पष्ट, बळकट स्त्रीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात माधुरी स्वत:च्या व समाजातील इतर महिलांच्या हक्कांसाठी लढणार्‍या एका महिलेच्या भूमिकेत होती. इतकेच नाही तर पतीच्या मृत्यूनंतरच्या त्रासाला सामोरे गेल्यानंतर ती आपल्या पतीच्या मृत्यूचा बदलाही घेते.

वॉटर

2005मध्ये ‘वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने समाजाला अनेक संदेश दिले. या चित्रपटात लिसा रे, सीमा विश्वास, सरला करियावासम मुख्य भूमिकेत होते. तरुण वयात विधवा झालेली आणि विधवा आश्रमात आल्यानंतरही सरला करियावासम तिच्या सामान्य जीवनाची स्वप्ने पाहते. तिच्याप्रमाणेच विधवा, परंतु थोडी वेगळी असणारी लिसा रे हिलादेखील आपली स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा आहे. सीमा विश्वास या दोघीना पाठींबा देतात. या चित्रपटात या तिन्ही अभिनेत्रींनी खूप चांगला अभिनय सादर केला.

द लास्ट कलर

2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘द लास्ट कलर’मध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या शानदार अभिनयाची छाप सोडली. हा संपूर्ण चित्रपट नीनाभोवती फिरतो. नूर म्हणजेच नीना गुप्ता एका विधवेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. विधवा धर्माचे अनुसरण करण्यासाठी तिने सर्व सुख सोडून दिले. मात्र तिची भेट आणखी एका महिलेशी होते. यानंतर चित्रपट या दोन महिलांच्या भोवती फिरत आहे.

(International Widow Day Bollywood movies based on Widows life)

हेही वाचा :

मोठ्या पडद्यापासून आणखी काही काळाचा ब्रेक, लेक ‘वामिका’साठी अनुष्का शर्माने घेतले मोठे निर्णय!

Happy Birthday Raj Babbar | स्मिता पाटीलच्या जाण्याने खचून गेले होते राज बब्बर, रेखाशी जवळीक वाढतच मिळू लागल्या धमक्या!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.