AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | इस्त्रायल मुद्द्यावर ट्रोल करणाऱ्यांना कंगना रनौतने सुनावले खडे बोल, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कंगना यापूर्वी ट्विटरवर खूप अ‍ॅक्टिव होती. तिने प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही.

Kangana Ranaut | इस्त्रायल मुद्द्यावर ट्रोल करणाऱ्यांना कंगना रनौतने सुनावले खडे बोल, म्हणाली...
कंगना रनौत
| Updated on: May 17, 2021 | 10:42 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कंगना यापूर्वी ट्विटरवर खूप अ‍ॅक्टिव होती. तिने प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. तिचे ट्विटर अकाउंट निलंबित झाल्यापासून अभिनेत्री इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय झाली आहे. तिने आता इंस्टाग्रामवरून आपली बेधडक मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच कंगनाने इस्त्रायल प्रकरणावर भाष्य करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानंतर तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आता कंगनाने देखील या ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत (Israel case Kangana Ranaut criticized trollers on social media).

कंगनाने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आणि इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये अनेक वर्षांपासून काय सुरू आहे, हे सांगितले. त्यानंतर, त्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ज्यांनी तिला ट्रोल केले, त्यांना चांगलेच बोल ऐकवले. कंगनाने लिहिले, ‘इस्त्राईल कसा बनला हे आपण व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहू शकता. त्यांनी ते इंग्रजांकडून काढून घेतले आणि संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाच्या सहाय्याने ते तयार केले. त्यानंतर त्याच्यावर 6 मुस्लिम राष्ट्रांनी हल्ला केला. त्यानंतर ते त्यांच्यावर सातत्याने हल्ले करून ताब्यात घेत आहेत. कारण जेव्हा आपण युद्ध जिंकता तेव्हाच असे होते.’

सम्पूर्ण जगाला वेडं बनवताय…

कंगनाने आपला शाळा इथेच संपवली नाही. तिने पुढे लिहिले की, जर आपण तर्कशास्त्र विचार करत असू तर भारतात फक्त हिंदू असावेत, अमेरिकेत रेड इंडियन आणि ऑस्ट्रेलियामध्ये आदिवासी असावेत. ज्यू बेकायदेशीर लोकांच्या या जगात आपण कोठेही राहण्यास योग्य नाही. संपूर्ण जगाला मूर्ख बनवून ठेवले आहे. यांना गुंडगिरी करायची आहे. संपूर्ण जगात ही वृत्ती डोके वर काढत आहे आणि खोटा मीडिया आणि वेदे लोक चुकीचा अर्थ लावण्यासाठी याचा वापर करत आहेत.’(Israel case Kangana Ranaut criticized trollers on social media)

पहा कंगनाची पोस्ट

Kangana 2

कंगनाची पोस्ट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर कंगना रनौत लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी प्रसिद्ध झाली आहेत.

(Israel case Kangana Ranaut criticized trollers on social media)

हेही वाचा :

‘बागबान’ फेम अभिनेत्याला अ‍ॅम्ब्युलन्सने फरफटत नेलं, साहिल चढ्ढा रुग्णालयात

Video: बिकीनीत सायकलिंग, कृष्णा श्रॉफच्या बोल्ड अंदाजामुळे चाहते क्लिन ‘बोल्ड’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.