AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jacqueline at ED Office | जॅकलिन फर्नांडिस दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी होणार!

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागच्या अडचणी काही थांबण्याचे नावच घेत नाही आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ती आज (8 डिसेंबर) दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली आहे. 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिची चौकशी होणार आहे.

Jacqueline at ED Office | जॅकलिन फर्नांडिस दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी होणार!
Jacqueline Fernandez
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 12:42 PM
Share

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागच्या अडचणी काही थांबण्याचे नावच घेत नाही आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ती आज (8 डिसेंबर) दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली आहे. 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिची चौकशी होणार आहे. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. ज्यासोबत जॅकलिनचे अनेक इंटिमेट फोटो मीडियामध्ये व्हायरल झाले होते.

या प्रकरणी जॅकलिनला नुकतीच ईडीने पुन्हा चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटीस पाठवली होती. 5 डिसेंबर रोजी तिला परदेशात जाण्यापासूनही विभागाने रोखले होते. विमानतळावर पोहोचल्यावर जॅकलिनला थांबवण्यात आलं. जॅकलिन ही श्रीलंकेची नागरिक असून, ती देशाबाहेर पळून जात असल्याच्या संशयावरून तिला विमानतळावर थांबवण्यात आले होते.

सुकेश चंद्रशेखर यांच्याशी जवळीक

चेन्नईतील महाठक सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे काही फोटो समोर आल्यानंतर ईडीने पुन्हा एकदा तिच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. यापूर्वीही जॅकलिनची ईडीने चौकशी केली होती. याप्रकरणी तिच्यासोबत नोरा फतेहीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुकेशसोबत काही संबंध नसल्याचे जॅकलिनने तिच्या पीआर टीमद्वारे स्पष्ट केले असले, तरी आता तिच्या फोटोंमुळे संपूर्ण काम बिघडले आहे.

10 कोटींची भेट?

अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, सुकेश याने फसवणुकीतून कमवलेल्या पैशातून जॅकलिनला 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये आलिशान कार आणि महागड्या दागिन्यांचा समावेश आहे. तसेच 52 लाख किंमतीचा घोडा आणि 9 लाख किंमतीची मांजर भेट दिल्याचाही उल्लेख आहे. जॅकलिनने तिच्या सोशल मीडियावर या मांजरीची अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत. सुकेशवर तिहार तुरुंगात असताना एका व्यावसायिकाकडून 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात बंगळुरू आणि चेन्नईमध्ये 15 एफआयआर दाखल आहेत. बड्या व्यावसायिकांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तो पैसे घेत असे आणि त्यांचे कायदेशीर खटले निकाली काढायचे आणि नंतर पैसे घेऊन गायब व्हायचे, हे त्याचे काम होते. 2019 मध्ये त्याला पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतरही तो जॅकलिनला चेन्नईत भेटला आणि व्हायरल झालेली छायाचित्रे त्याच्या फोनवरून घेण्यात आली होती.

कतरिना आणि अल्लू अर्जुनच्या नावावर फसवणूक

कतरिना कैफ आणि अल्लू अर्जुन यांना कोची येथे एका कार्यक्रमात आणण्याच्या नावाखाली आयोजकांकडून 20 लाख रुपये घेण्यात आले होते आणि ते पैसे पैसे घेऊन सुकेशने पळ काढला होता.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.