Jug Jugg Jeeyo: वरुण धवन-कियारा अडवाणीच्या ‘जुग जुग जियो’ची आठवड्याभरात समाधानकारक कमाई

| Updated on: Jul 02, 2022 | 9:33 AM

पहिल्या दिवशी 8.50 कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट सोमवारी 47 टक्क्यांनी घसरून 4.50 कोटींवर आला. राज मेहता दिग्दर्शित जुग जुग जियोची मंगळवारच्या तुलनेत बुधवारी 10 टक्क्यांनी कमी झाली. अनेक ठिकाणी वीकेंडनंतर चित्रपटाची कमाई 50 टक्क्यांनी घसरल्याचं पहायला मिळालं.

Jug Jugg Jeeyo: वरुण धवन-कियारा अडवाणीच्या जुग जुग जियोची आठवड्याभरात समाधानकारक कमाई
Jug Jugg Jeeyo Movie
Image Credit source: Instagram
Follow us on

वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जुग जुग जियो’ (Jug Jugg Jeeyo) या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात समाधानकारक कमाई (Box Office Collection) केली आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता. मात्र सोमवारपासून कमाईत घसरण होऊ लागली. गेल्या सात दिवसांत ‘जुग जुग जियो’ने 53.66 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबद्दलची माहिती दिली. पहिल्या दिवशी 8.50 कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट सोमवारी 47 टक्क्यांनी घसरून 4.50 कोटींवर आला. राज मेहता दिग्दर्शित जुग जुग जियोची मंगळवारच्या तुलनेत बुधवारी 10 टक्क्यांनी कमी झाली. अनेक ठिकाणी वीकेंडनंतर चित्रपटाची कमाई 50 टक्क्यांनी घसरल्याचं पहायला मिळालं.

पहिल्या आठवड्याची कमाई-

शुक्रवार- 9.28 कोटी रुपये
शनिवार- 12.55 कोटी रुपये
रविवार- 15.10 कोटी रुपये
सोमवार- 4.82 कोटी रुपये
मंगळवार- 4.52 कोटी रुपये
बुधवार- 3.97 कोटी रुपये
गुरुवार- 3.42 कोटी रुपये
एकूण कमाई- 53.66 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनचं ट्विट-

या चित्रपटाला तिकिटबारीवर टिकून राहायचं असेल तर कमाईचा आलेख कायम ठेवावा लागेल. शुक्रवारपासून दुसरा आठवडा सुरू होत असताना बॉक्स ऑफिसवर आर माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ आणि आदित्य रॉय कपूरच्या ‘राष्ट्र कवच ओम’सोबत ‘जुग जुग जिओ’ची टक्कर होणार आहे. अशा स्थितीत कमाईत घट होण्याची शक्यता नक्कीच आहे.

‘जुग जुग जियो’ने सहा दिवसांत दिल्ली-एनसीआरमधील बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. याशिवाय पूर्व पंजाब आणि मुंबईतही कमाई चांगली झाली आहे. ‘जुग जुग जियो’ची कमाई पूर्णपणे मल्टिप्लेक्स प्रेक्षकांच्या हातात आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारपासून प्रेक्षकांनी ‘रॉकेटरी’ किंवा ‘राष्ट्र कवच ओम’ या चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला तर दुसरा आठवडा ‘जुग जुग जियो’साठी कठीण जाणार आहे. मात्र, हा चित्रपट 100 कोटींची कमाई करू शकणार नाही हे निश्चित झालं आहे. कमाईचा विचार केला तर हा चित्रपट 75-80 कोटींच्या जवळपास जाऊ शकेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.