JugJugg Jeeyo: वीकेंडला ‘जुग जुग जियो’ची ‘झक्कास’ कमाई; अनिल कपूर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Jun 26, 2022 | 11:38 AM

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यातील गाणी सोशल मीडियावर हिट ठरली. पंजाबन, दुपट्टा आणि रंगसारी या गाण्यांवर इन्स्टाग्रामवर रिल व्हिडीओ शेअर केले जाऊ लागले. आता माऊथ पब्लिसिटीचाही चित्रपटाच्या कमाईत फायदा होईल.

JugJugg Jeeyo: वीकेंडला जुग जुग जियोची झक्कास कमाई; अनिल कपूर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
JugJugg Jeeyo
Image Credit source: Youtube
Follow us on

वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या भूमिका असलेल्या ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) या चित्रपटाला वीकेंडला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 9.28 कोटी रुपयांचा गल्ला (Box Office Collection) जमवला. त्यानंतर शनिवारी 12 कोटी रुपयांची कमाई झाली. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात मनिष पॉल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीचीही (Prajakta Koli) भूमिका आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यातील गाणी सोशल मीडियावर हिट ठरली. पंजाबन, दुपट्टा आणि रंगसारी या गाण्यांवर इन्स्टाग्रामवर रिल व्हिडीओ शेअर केले जाऊ लागले. आता माऊथ पब्लिसिटीचाही चित्रपटाच्या कमाईत फायदा होईल. शुक्रवारच्या कमाईच्या तुलनेत शनिवारी 40 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. रविवारीसुद्धा असाच प्रतिसाद मिळाला तर कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आतापर्यंत या वर्षात पहिल्या दिवशी दमदार कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये ‘जुग जुग जियो’चा समावेश झाला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ हा चित्रपट आहे. तर ‘जुग जुग जियो’ हा पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीने भूमिका साकारली आहे.

पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 चित्रपट (वर्ष- 2022)

1- भुल भुलैय्या 2- 14.11 कोटी रुपये
2- बच्चन पांडे- 13.25 कोटी रुपये
3- सम्राट पृथ्वीराज- 10.70 कोटी रुपये
4- गंगुबाई काठियावाडी- 10.50 कोटी रुपये
5- जुग जुग जियो- 9.28 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

या चित्रपटातून नीतू कपूर यांनी बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला त्यांचा हा पहिला चित्रपट आहे.

चित्रपटाची कथा-

या चित्रपटाची सुरुवात कुकू (वरुण धवन) आणि नैना (कियारा अडवाणी) यांच्या लव्हस्टोरीने होते. लहानपणापासून दोघं एकमेकांना पसंत करतात आणि मोठे झाल्यावर लग्नाचा निर्णय घेतात. लग्नानंतर पाच वर्षांनी कथा पुढे सरकते. कुकू आणि नैना हे पटियालाहून कॅनाडाला पोहोचतात. मात्र आता त्यांच्या नात्यात प्रेम उरत नाही. दोघं सतत भांडण करत असतात. ही भांडणं इतकी टोकाला पोहोचतात की अखेर दोघं घटस्फोटाचा निर्णय घेतात. घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात, तेव्हाच कुकूची छोटी बहीण गिन्नीच्या लग्नाची बोलणी होते. बहिणीच्या लग्नासाठी कुकू आणि नैना भारतात येतात. याच संधीचा फायदा घेत दोघं आपल्या कुटुंबीयांना घटस्फोटाबद्दल सांगण्याचा निर्णय घेतात. मात्र इतक्यात त्यांनाच मोठा धक्का बसतो. कुकूचे वडील भीम (अनिल कपूर) आणि आई गीता (नीतू कपूर) हेच घटस्फोट घेणार असल्याचं त्याला कळतं. यापुढे काय होतं, हे प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल.