Kangana Ranaut Love Life | इंस्टावर शेअर केले बॉयफ्रेंडच्या बाहुपाशात विसावलेल्या तरुणीचे चित्र, कंगना रनौतला नेमकं म्हणायचंय तरी काय?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक सिक्रेट पोस्ट लिहिली आहे.

Kangana Ranaut Love Life | इंस्टावर शेअर केले बॉयफ्रेंडच्या बाहुपाशात विसावलेल्या तरुणीचे चित्र, कंगना रनौतला नेमकं म्हणायचंय तरी काय?
Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक सिक्रेट पोस्ट लिहिली आहे. यात तिने प्रियकराच्या मिठीत असलेल्या महिलेचा एक स्केचफोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत कंगनाने लिहिले की, ‘तेरे लिए हम है जिये…. कितने सितम हमपे सनम…’ कंगनाची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त तिच्या हृदयाची स्थिती जाणून घ्यायची आहे.

कंगनाची ही पोस्ट करताना सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कंगनाची प्रेमात फसवणूक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कंगनाने तिची लव्ह लाईफ आत्तापर्यंत सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. पण, ती तिच्या पहिल्या ब्रेकअप आणि रिलेशनशिपबद्दल सध्या उघडपणे बोलत आहे. त्याचवेळी, ही पोस्ट पाहिल्यानंतर प्रत्येकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, कंगनाचे पुन्हा ब्रेकअप झालेय की, की ती कोणाच्या तरी आठवणीत आहे.

पाहा पोस्ट :

‘तेरे लिए हम है जिये…’ हे शाहरुख खान आणि प्रीती झिंटाच्या 2004 मध्ये आलेल्या चित्रपटातील एक सुपरहिट गाणे आहे, ज्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यात नेहमीच कोणता ना कोणता वाद होत असतो. अशा स्थितीत कंगनाची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

लवकरच घेणार सात फेरे

काही दिवसांपूर्वी कंगनाने तिच्या लग्नाबाबतही चर्चा केली होती. कंगना रनौत एका समिटमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने याबद्दल चर्चा केली आणि सांगितले की, तिला पुढील 5 वर्षात लग्न करायचे आहे आणि ती याच काळात ती आई देखील बनू इच्छित आहे. लवकरच ती तिच्या जोडीदाराविषयी सर्वांना सांगणार आहे, असेही कंगनाने सांगितले.

या मुलाखतीदरम्यान जेव्हा कंगनाला विचारण्यात आले की, येत्या 5 वर्षात मला लग्न करायचे आहे आणि नंतर मुलेही हवी आहेत. येत्या 5 वर्षांत मी स्वत:ला एक आई म्हणून पाहणार आहे. यानंतर कंगनाला विचारण्यात आले की, ती आई आणि पत्नी होण्यासाठीच्या मिशनवर काम करत आहे का? तर अभिनेत्री हसली आणि म्हणाली, हो. त्यानंतर कंगनाला तिच्या जोडीदाराबद्दल विचारले असता ती म्हणाली, तुम्हाला लवकरच कळेल. जेव्हा कंगनाला पुन्हा विचारण्यात आले की, ती प्रेमात आणि नात्यात आनंदी आहे का, तेव्हा ती म्हणाली, “हो, नक्कीच आणि लवकरच तुम्हाला उर्वरित तपशील कळतील.”

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात


Published On - 12:31 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI