Karan Johar चित्रपटामध्ये कास्ट करण्याच्या अगोदर कलाकारांमध्ये या गोष्टी शोधतो, जाणून घ्या याबद्दल…

पुढे प्रश्न विचारत रितेश करणला म्हणतो की, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या चित्रपटामध्ये कास्ट करण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबी समोरच्या व्यक्तीमध्ये पाहता? म्हणजे त्याचे दिसणे, त्याचे व्यक्ती महत्व, सुंदर दिसणे यापैकी नेमके काय पाहून चित्रपटामध्ये कास्ट करतात.

Karan Johar चित्रपटामध्ये कास्ट करण्याच्या अगोदर कलाकारांमध्ये या गोष्टी शोधतो, जाणून घ्या याबद्दल...
| Updated on: Sep 10, 2022 | 7:36 AM

मुंबई : करण जोहर (Karan Johar) नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांपासून फक्त स्टार किड्सला लॉन्च करत असल्याचा आरोप सातत्याने करणवर केला जातोयं. अनेकांनी करणच्या चित्रपटांवर बहिष्कार देखील टाकलायं. मात्र, असे असतांना देखील करण त्याच्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत राहतो. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून करणने महेश भट्ट यांची मुलगी म्हणजेच आलिया भट्टला (Alia Bhatt) लॉन्च केले होते, त्यावेळीही करणवर सर्वच स्तरातून मोठी टिका झाली होती. त्यानंतर आलियाला बाॅलिवूडचे अनेक चित्रपटही मिळाले. अभिनेता रितेश देखमुखने (Riteish Deshmukh) विचारलेल्या एका प्रश्नानंतर करण जोहर चर्चेत आलायं.

रितेश देशमुखने केला करण जोहरवर प्रश्नांचा भडिमार

Amazon MiniTV कोर्टरूम कॉमेडी शो ‘केस तो बना है’ च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये करण जोहर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये जनतेचे वकील असलेले रितेश देशमुख करणला काही खास प्रश्न विचारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे रितेशच्या काही प्रश्नांमुळे करणची गोची होताना स्पष्ट दिसतंय. कुछ कुछ होता है, ऐ दिल है मुश्किल, स्टुडंट ऑफ द इयर या करणच्या चित्रपटातील काही संभाषणाची रितेश मजाक उडवताना दिसतोयं.

कलाकारांना कास्ट करण्यावर करणने केला मोठा खुलासा

पुढे प्रश्न विचारत रितेश करणला म्हणतो की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या चित्रपटामध्ये कास्ट करण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबी पाहता? म्हणजे त्याचे दिसणे, त्याचे व्यक्तीमहत्व, सुंदर दिसणे यापैकी नेमके काय पाहून चित्रपटामध्ये कास्ट करता. रितेशच्या या प्रश्नावर काही वेळ करण शांत होतो आणि म्हणतो की, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट…हा मात्र, कधी कधी मी टॅलेंट, टॅलेंट, टॅलेंट शोधण्याचाही प्रयत्न करतो. सध्या करणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोयं.