AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्याचार प्रकरणात बॉलिवूडच्या ‘या’ गायकाला अटक होण्याची शक्यता; कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

हा गुन्हा गंभीर आहे. त्याची सखोल चौकशी आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील सत्र न्यायालयाने राहुल जैनचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे.

अत्याचार प्रकरणात बॉलिवूडच्या 'या' गायकाला अटक होण्याची शक्यता; कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
अत्याचार प्रकरणात बॉलिवूडच्या 'या' गायकाला अटक होण्याची शक्यताImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2022 | 11:35 PM
Share

मुंबई : बलात्कार प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी एक कलाकार चांगलाच अडचणीत सापडला आहे. मुंबईतील एका न्यायालयाने बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैन (Rahul Jain)चा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-arrest Bail) फेटाळला आहे. त्यामुळे राहुल जैनवर अटकेची टांगती तलवार आहे. त्याने एका कॉस्ट्युम स्टाइलिस्टवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप असून पोलिसांनी याप्रकरणी त्याच्याविरुद्व गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राहुलने अटकेची कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. तथापि न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.

गुन्हा गंभीर, सखोल चौकशी आवश्यक : न्यायालय

हा गुन्हा गंभीर आहे. त्याची सखोल चौकशी आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील सत्र न्यायालयाने राहुल जैनचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे.

दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. झेड. खान यांनी मंगळवारी हा निर्णय दिला होता. त्याचा सविस्तर आदेश शुक्रवारी उपलब्ध झाला.

पीडितेशी इंस्टाग्रामवर साधला संपर्क आणि…

30 वर्षीय तरुणीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे ओशिवरा पोलिसांनी गेल्या महिन्यात राहुल जैनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, राहुल जैनने पीडितेशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आणि तिच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर त्याने ऑक्टोबर 2020 मध्ये तिला अंधेरी येथील आपल्या घरी बोलावले. तिथे त्याने दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर दोन वर्षांनी पीडितेने केली तक्रार

आरोपी राहुल जैनने पीडितेला वैयक्तिक कॉस्ट्यूम स्टाइलिस्ट बनविण्याच्या बहाण्याने हे कृत्य केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही राहुल जैनने दिल्याचे तक्रारदार तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हा घडून जवळपास दोन वर्षे उलटल्यानंतर पीडित तरुणीने गेल्या महिन्यात 11 ऑगस्ट रोजी पोलिसांशी संपर्क साधला.

राहुल जैनने गैरफायदा घेतला; न्यायालयाचे निरीक्षण

न्यायालयाने या प्रकरणात रेकॉर्डवर ठेवलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. आरोपी आणि तक्रारदार हे दोघेही चित्रपट उद्योगात काम करत होते. यापैकी आरोपी राहुल जैनने गैरफायदा घेतला आणि पीडितेला आपल्या घरी बोलावून बलात्काराचा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.

हा गुन्हा गंभीर आहे. याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. आरोपीची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे, असे न्यायालय म्हणाले. राहुल जैनने यापूर्वी 2021 मध्ये बलात्कार, बळजबरीने गर्भपात आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.