मुंबई : मुंबई शहर व उपनगरांसह सर्वत्र गणपती विसर्जनाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अशातच मुंबईतील वांद्रेमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्लेखोराने गोळीबार (Firing) करून पळ काढला असून त्याने केलेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी (Injury) झाला आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी वांद्रे पोलिसांनी परिसरात नाकाबंदी (Blockade) केली आहे.