‘प्लीज आता तिसरं बाळ नको म्हणू…’, करीनाच्या हातातील अल्ट्रासाऊंडचे फोटो पाहून चाहते पडले बुचकळ्यात!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) तिच्या इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीनाच्या हातात अल्ट्रासाऊंडची कॉपी दिसत आहे. करीनाचा हा फोटो पाहून सोशल मीडिया युझर्स आणि तिचे चाहते खूप गोंधळले आहेत.

‘प्लीज आता तिसरं बाळ नको म्हणू...’, करीनाच्या हातातील अल्ट्रासाऊंडचे फोटो पाहून चाहते पडले बुचकळ्यात!
करीना कपूर-खान

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) तिच्या इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीनाच्या हातात अल्ट्रासाऊंडची कॉपी दिसत आहे. करीनाचा हा फोटो पाहून सोशल मीडिया युझर्स आणि तिचे चाहते खूप गोंधळले आहेत. हा फोटो दाखवून करीना नक्की काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे, हे लोकांना समजलेले नाही. मात्र, करीनाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आणि वापरकर्त्यांनी करीनाच्या पोस्टवर अतिशय विचित्र कमेंट करत, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत (Kareena Kapoor Khan Posted an ultrasound photo on social media goes viral).

करीनाच्या कॅप्शनमुळे उडाला गोंधळ

शेअर केलेल्या या फोटोमध्ये करीना रेड ड्रेसमध्ये दिसत आहे. ती कॅमेर्‍यामध्ये अल्ट्रासाऊंड फोटो दाखवताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काही रोमांचक गोष्टींवर काम करत आहे…पण आपण जो विचार करत आहात, हे ते नाही.. थोडावेळ वाट पाहा… # कमिंगसून”.

पाहा करीनाची पोस्ट :

करीनाने तिचा हा फोटो पोस्ट करताच अर्ध्या तासाच्या आत दीड लाखाहून अधिक लोकांना तो आवडला आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाउस पडत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या पोस्टद्वारे करीना काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे हे तिलाच माहित! परंतु, तिची पोस्ट पाहून नेटकऱ्यांना नक्कीच थोडासा धक्का बसला आहेत. या पोस्टवर कोणी तिच्या गर्भावस्थेबद्दल भाष्य करत आहे, तर कोणीतरी असे म्हणत आहे की, करीना आपल्या नव्या शोबद्दल एक इशारा देत आहे. बर्‍याच वापरकर्त्यांनी तिच्या पोस्टवरील कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, ‘कृपया असे म्हणू नकोस की, तिसरा मुल येणार आहे.’ त्याच वेळी, काही वापरकर्ते गोंधळलेले इमोजी पोस्ट करून आपला अभिप्राय देत आहेत.

मीडियापासून लपवतेय बाळाचा चेहरा!

काही दिवसांपूर्वी करीनाने तिच्या लहान बाळाचा, तैमूर आणि सैफचा एक फोटो शेअर केला होता. परंतु, त्यामध्ये नवजात बाळाचा चेहरा दिसत नव्हता. करीना आणि सैफने धाकटा मुलाच्या जन्मापूर्वी निर्णय घेतला होता की, ते आपल्या धाकट्या मुलाला मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर ठेवतील. तैमूरप्रमाणेच आपल्या लहान मुलाने देखील चर्चेत यावे, अशी त्यांची इच्छा नाही.

जेव्हा जेव्हा तैमुर त्याच्या आई वडिलांसोबत बाहेर येतो तेव्हा छायाचित्रकार त्याचे फोटो काढायला लागतात. सुरुवातीला तैमूरला याचा खूप राग यायचा आणि कधीकधी तो फोटोग्राफरवरही चिडायचा, पण आता त्याला त्याची सवय झाली आहे. आता तो कॅमेरा पाहून हाय किंवा बायसुद्धा म्हणतो.

(Kareena Kapoor Khan Posted an ultrasound photo on social media goes viral)

हेही वाचा :

Video | ‘ते निघून गेले पण त्यांच्या आठवणी राहतील…’, दिलीप कुमारांच्या आठवणीने भावूक झाले धर्मेंद्र

Kareena kapoor baby boy name : सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव आलं समोर, ‘या’ नावाने ओळखला जाणार तैमूरचा भाऊ!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI