AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अभिनय सोड नाहीतर…” गर्लफ्रेंडच्या त्या अटीवर कर्तिक आर्यने घेतला मोठा निर्णय; लव्ह लाईफबद्दल अभिनेत्याचा खुलासा

कार्तिकने इंडस्ट्रीत स्वत:चे असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या कामाप्रमाणेच त्याच्या लव्ह लाइफच्या चर्चाही तेवढ्याच झालेल्या आहेत. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान कार्तिकने त्याच्या लव्ह लाईफबद्दल अगदी उघडपणाना सांगितले आहे.

अभिनय सोड नाहीतर... गर्लफ्रेंडच्या त्या अटीवर कर्तिक आर्यने घेतला मोठा निर्णय; लव्ह लाईफबद्दल अभिनेत्याचा खुलासा
| Updated on: Nov 24, 2024 | 5:41 PM
Share

बॉलिवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा काही नवीन नाहीत. मात्र त्याबद्दल काही कलाकार अगदी उघडपणाने बोलतात तर काही जण स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा करणे टाळतात. पण एका अभिनेत्याने त्याच्या लव्ह लाईफबद्दल उघडपणे चर्चा केली आहे. तो अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन.

कार्तिक आर्यनने स्वत:ची अशी वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर तयार केली आहे. कार्तिकने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. नुकताच रिलीज झालेल्या कार्तिकच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाने कोटींची कमाई केली. कार्तिक जसा त्याच्या चित्रपटामुळे जसा चर्चेत असतो तसाच तो त्याच्या लव्ह लाईफमुळेही तेवढाच चर्चेत असतो. त्याने नुकतच एका मुलाखतीमध्ये त्याच्या लव्ह लाईफबद्दलचे काही किस्से शेअर केले आहे.

पुढे बॉलीवूडमध्ये आल्यावरही कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींसोबतही त्यांचे नाव जोडले गेले. 22 नोव्हेंबर 2024 ला कार्तिक आर्यन त्याचा वाढदिवस साजरा करतोय. जाणून घेऊ त्याच्या लव्ह लाईफ विषयी इंट्रेस्टींग गोष्टी ..

अभिनय केलास तर सोबत राहणार नाही…

कार्तिकने सांगितले की त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे कॉलेजमध्ये असतात त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती. कार्तिकने सांगितले की “माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की मी अभिनय केला तर ती माझ्यासोबत राहणार नाही. ती म्हणाली होती की ती एका अभिनेत्याचे आयुष्य सांभाळू शकत नाही.” अस स्पष्ट मत मांडत त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत असलेले नात तोडलं होतं.

सारा आणि अनन्या पांडेसोबत नाव जोडलं होतं 

बॉलिवूडमध्ये आल्यानंतरहील कार्तिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यातील पहिलं नाव म्हणजे सारा अली खान. 2019 मध्ये अभिनेत्री सारा अली खानसोबत कार्तिकचं नाव जोडलं गेलं. इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.

या दोघांच्या डेटिंगची चर्चाही नंतर येऊ लागल्या. पण दोघांकडून याबाबत अधिकृत घोषणा कधीही करण्यात आली नाही. साराबद्दल विचाराताच कार्तिकने सांगितले होते की,” मी कोणलाही डेट करत नाही. मी सिंगल आहे.” पण कॉफी विथ करण शोमध्ये बोलताना साराने मी कार्तिकला डेट केल्याचे कबूल केलं होतं. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांचे ब्रेकअप झाले होते. आता दोघेही मित्रच आहेत.

त्यानंतर त्याचे नाव जोडले गेले अनन्या पांडेसोबत. 2021 मध्ये कार्तिक आणि अनन्या पांडेच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटात त्यांनी काम केले होते. दोघांनीही त्यांच्या नात्याला कधीही पुष्टी दिली नाही.

दरम्यान कार्तिकला 2018 मध्ये रिलीज झालेला `सोनू के टीटू की स्वीटी`या चित्रपटामुळे एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली होती. कार्तिकने 12 वर्षांत 16 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात शॉर्ट फिल्म, धमाका, फ्रेडी यासारखे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. इतर 13 चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.