Khoya Khoya Chand | रातोरात सुपरस्टार बनलेली ‘तुम बिन’ची संदली सिन्हा, पाहा आता काय करतेय…

संदलीच्या निरागसपणाने चाहत्यांची मने जिंकली, पण ती जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये काम करू शकली नाही. लोक विचार करत होते की, संदाली ही मोठ्या अभिनेत्रीशी स्पर्धा करेल. मात्र, तिने मनोरंजन विश्वाचा निरोप घेऊन इंडस्ट्री सोडली.

Khoya Khoya Chand | रातोरात सुपरस्टार बनलेली ‘तुम बिन’ची संदली सिन्हा, पाहा आता काय करतेय...
संदली सिन्हा

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार येतात, आपली जादू पसरवतात आणि नाहीसे होतात. ते बॉलिवूडमध्ये फार काळ टिकत नाहीत. बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटानेच सर्वांनाच फॅन बनवले. तिच्या निरागसपणे आणि सौंदर्याने सर्वांच्या हृदयात हक्काचे स्थान निर्माण केले होते. ‘तुम बिन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. परंतु, या चित्रपटातून अभिनेत्री संदाली सिन्हाने (Sandali Sinha) स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले होते आणि अजूनही या चित्रपटाची गाणी रसिकांच्या जिभेवर आहेत.

संदलीच्या निरागसपणाने चाहत्यांची मने जिंकली, पण ती जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये काम करू शकली नाही. लोक विचार करत होते की, संदाली ही मोठ्या अभिनेत्रीशी स्पर्धा करेल. मात्र, तिने मनोरंजन विश्वाचा निरोप घेऊन इंडस्ट्री सोडली.

संदलीने ‘तुम बिन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिच्या पहिल्या चित्रपटापासून ती रातोरात स्टार बनली होती. चाहत्यांना असे वाटू लागले होते की, ती त्या काळातील मुख्य अभिनेत्रीशी स्पर्धा करणार आहे. पण तसे होऊ शकले नाही. ‘तुम बिन’नंतर कोणत्याही चित्रपटात संदलीला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली नाही. ती फक्त सहाय्यक भूमिकांमध्ये दिसली.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केले काम

‘तुम बिन’नंतर संदली ‘पिंजर’ आणि ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’मध्ये दिसली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटासाठी संदलीच्या अभिनयाचेदेखील कौतुक केले गेले होते. परंतु, सहायक भूमिकेमुळे तिच्या कारकिर्दीवर फारसा परिणाम झाला नाही. बरेच प्रयत्न करूनही संदालीला बॉलिवूडमध्ये ओळख मिळू शकली नाही, याचा विचार करून तिने इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पाऊल ठेवले आहे.

दक्षिणात्य चित्रपटातून पुनरागमन

जेव्हा, बॉलिवूडमध्ये यश मिळत नव्हतं, तेव्हा काही वर्षांचा ब्रेक घेत संदालीने पुन्हा एकदा अभिनयात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. पण, यावेळी बॉलिवूड नव्हे तर त्याने दक्षिण इंडस्ट्रीमधून परतण्याचा विचार केला. पण, त्यातही तिला यश मिळवता आले नाही.

पतीचा व्यवसाय सांभाळतेय अभिनेत्री

संद्लीने 2005 मध्ये व्यावसायिक किरण सालस्कर यांच्याशी लग्न केले. आता ती आपल्या पतीला व्यवसाय सांभाळण्यात मदत करत आहे. चित्रपटांपासून दूर संदली आता लाखो रुपयांच्या व्यवसायाची मालक असून, ती यशस्वीपणे तो हाताळत आहे.

(Khoya Khoya Chand know about Tum bin actress Sandali Sinha)

हेही वाचा :

Photos : ‘ही’ हॉलिवूड अभिनेत्री आहे असिनची ड्युप्लिकेट कॉपी, फोटो पाहिलेत?

तैमूर इतकाच क्युट दिसतो ‘जेह’, करीनाच्या फॅनक्लबने शेअर केला छोट्या नवाबाचा पहिला फोटो!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI