तैमूर इतकाच क्युट दिसतो ‘जेह’, करीनाच्या फॅनक्लबने शेअर केला छोट्या नवाबाचा पहिला फोटो!

जन्मानंतर तब्बल 4 महिन्यांनंतर करीना कपूर-खानच्या (Kareena Kapoor-Khan) दुसर्‍या मुलाचा पहिला फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत करीना कपूर-खान आपल्या गोंडस मुलाला कपाळावर चुंबन देताना दिसत आहे.

तैमूर इतकाच क्युट दिसतो ‘जेह’, करीनाच्या फॅनक्लबने शेअर केला छोट्या नवाबाचा पहिला फोटो!
करीना कपूर-खान

मुंबई : जन्मानंतर तब्बल 4 महिन्यांनंतर करीना कपूर-खानच्या (Kareena Kapoor-Khan) दुसर्‍या मुलाचा पहिला फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत करीना कपूर-खान आपल्या गोंडस मुलाला कपाळावर चुंबन देताना दिसत आहे. स्वत: पापाराझी मानव मंगलानी यांनी हा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

पहिल्यांदा समोर आला जेहचा फोटो

फोटो शेअर करताना मानवने लिहिले की, ‘आई करीना कपूर खानसोबत क्यूट लिटल जेह.’ अभिनेत्री करीना कपूर-खानच्या मुलाच्या जन्मापासूनच त्याचे नाव आणि त्याची छायाचित्रे मीडियापासून लपवली गेली होती. आता पहिल्यांदाच करीनाचा दुसरा मुलगा ‘जेह’ याचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावरील चाहते करीनाच्या दुसर्‍या मुलाच्या क्युटनेसचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

फोटोच्या अँगलवर प्रश्नचिन्ह

या पोस्टवर काही वापरकर्त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि फोटोच्या अँगलवर प्रश्नचिन्ह लावले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘तरीही हा फोटो स्पष्ट नाही. तैमूरवर बरेच फोकस करण्यात आला होता. परंतु दुसर्‍या मुलाबरोबर असे केले जात नाही.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘तो तैमूरसारखा दिसत आहे.’ तैमूर आणि जेहच्या चेहऱ्यातील साम्यतेबद्दल इतरही बर्‍याच लोकांनी लिहिले आहे.

पुस्तकात दिसणार फोटो?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, करीना कपूर खानने आपल्या दोन्ही मुलांसहित केलेले हे फोटोशूट तिच्या पुस्तकात छापण्यात आले आहे. लोक अशी पोस्ट करून करीनाच्या पुस्तकाचे प्रमोशन करण्याविषयी बोलत आहेत. करीना कपूर खानचे ‘प्रेग्नन्सी बायबल’ हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

‘जेह’ नावाचा अर्थ काय?

ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारे लोक ‘जेह’ म्हणजे ‘येणे’ असा दावा करतात. या नावाचा अर्थ खूप सकारात्मक आहे आणि हा एक पारशी शब्द आहे, जो सैफ आणि करीना (Kareena Kapoor-Khan) यांनी आपल्या मुलाच्या नावासाठी निवडला आहे. करीना कपूर खान आणि सैफच्या पहिल्या मुलाच्या नावावर बरीच चर्चा आणि वादंग झाले होते, त्यानंतर या वेळी दोन्ही सेलिब्रिटींनी आपल्या मुलाचे नाव रिव्हील करण्यासाठी बराच वेळ घेतला आहे.

(Kareena Kapoor Khan’s Fan club revel her second baby jeh’s first photo on social media)

हेही वाचा :

तुम्हालाही अभिनय शिकायचाय? अक्षय कुमार देतोय सुवर्णसंधी, ‘खिलाडी’ने सुरु केले प्रोफेशनल मास्टर क्लास!

Taapsee Pannu | ‘आऊटसायडर्स’साठी तापसी पन्नूचा खास प्लॅन, निर्माती बनून देणार नवी संधी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI