Kareena Kapoor Book | करीना कपूरचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात, ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप, बीडमध्ये तक्रार दाखल

Kareena Kapoor Book | करीना कपूरचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात, ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप, बीडमध्ये तक्रार दाखल
KAREENA KAPOOR BOOK

बीड : काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेञी करीना कपूर आणि तिची सहकारी लेखिका आदिती शहा यांनी  ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कारण या पुस्तकाच्या नावातील बायबल शब्दाच्या वापरावर आक्षेप घेण्यात आला आहे. या नावामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने […]

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: Akshay Adhav

Jul 15, 2021 | 9:13 AM

बीड : काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेञी करीना कपूर आणि तिची सहकारी लेखिका आदिती शहा यांनी  ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कारण या पुस्तकाच्या नावातील बायबल शब्दाच्या वापरावर आक्षेप घेण्यात आला आहे. या नावामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केला आहे. ओमेगा ख्रिश्चन महासंघाने करीना कपूरविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  (case registered against Kareena Kapoor over book name people demand to remove Bible word)

ख्रिश्चन महासंघाचा आरोप काय ?

पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने करीना कपू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा पवित्र धर्मग्रंथ आहे. तरी करीन कपूर यांनी लिहलेल्या पुस्तकात बायबल शब्दाचा वापर केला आहे असे म्हणत या पुस्तकातील बायबल शब्द तत्काळ हटवावा अशी मागणी महासंघाने केली आहे. तसेच धार्मिक भावना दुखवील्याप्रकरणी कलम 295-A अंतर्गत करीना कपूर आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेसुद्धा महासंघाने म्हटले आहे.

करीना कपूर यांनी माफी मागावी

सोबतच आभिनेत्री करीना कपूर, आदिती शहा तसेच प्रकाशकांनी तत्काळ ख्रिश्चन समाजाची माफी मागावी, अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे.

अॅमेझॉनवर बेस्ट सेलर म्हणून पुस्तक ट्रेंडिंगवर

दरम्यान, दोन मुलांची आई झाल्यानंतरही करीना आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. काही दिवसांपूर्वीच करीनाने तिचे पहिलेच पुस्तक ‘करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ चे मुखपृष्ठ लाँच केले होते. या पुस्तकाच्या कव्हरचे लाँचिंग झाल्यानंतर amazon मधील प्रथम क्रमांकाचा बेस्टसेलर म्हणून हे पुस्तक ट्रेंडिंगवर आले होते. हे पुस्तक काही तासांतच वेगाने पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाले होते. त्यानंतर आता याच पुस्तकावरुन हा वाद निर्माण झाला आहे.

इतर बातम्या :

Sonam Kapoor | वर्षभरानंतर भारतात परतली सोनम कपूर, वडिलांना पाहताच झाली भावूक, पाहा व्हिडीओ

KL Rahul-Athiya Shetty | इंग्लंडमध्ये एकत्र नांदतायत क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी, जॅकेटने केली पोलखोल!

OTT Debut | डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार कंगना रनौत, रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट

(case registered against Kareena Kapoor over book name people demand to remove Bible word)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें